Friday, March 29, 2019

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .

श्री स्वामी महाराजांच्या हस्तस्पर्शात किती सामर्थ आहे याची प्रचिती गावकरी लोकांना आली 

स्वामी महाराज पाथरी वरून हिंगोली गावी आले .ऊन्हाळ्याचे दिवस होते पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्क्ष.हिंगोली मध्ये आधीच पाण्याचे दुष्काळ.गावात मोजक्याच विहीरी होत्या .त्यात एका विहिरीला पाणी होते पण ते दुषित म्हणून कुणीही पित  नसे .जनावरां
नाही पिण्या योग्य नव्हते .त्यात असख्य किडे पडलेले होते .जेव्हा स्वामी महाराज 
तहानेने व्याकुळ झाले तेव्हा ते त्या विहिरी जवळ आले  पण जवळच्या लोकांनी त्यांना 
हटकले आणि सांगितले की ह्या विहीरीचे पाणी पिण्या योग्य नाही .जवळ पासच्या विहीरी कोरड्या आहेत स्वामी महाराजांनी 
शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले आणि विहीरीला असलेल्या पायर्याने विहिरीत उतरले जवळ असलेल्या कमंडलूत विहिरीचे पाणी घेतले वर येऊन हात पाय धुतले आणि पाणी प्याले .उपस्थित ग्रामस्थ हा प्रकार पाहत होते त्यांनी विहरीत डोकावून पाहिले तर काय चमत्कार विहरीच्या आतील पाणी
नितळ स्वच्छ झालेले दिसले .त्यात  कुठेही जीव जंतू शेवाळ  दिसले नाही .ह्या सत्पुरूषाच्या स्पर्शाने विहरीच्या चे पाणी स्वच्छ झाले .गावात पिण्या योग्य पाणी गावकरी मंडळींना मिळाले सर्वानी महाराजांचा जय जय कार केला .स्वामी महाराजांच्या हस्तस्पर्शाने हिंगोलीकरांना 
पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली .
श्री स्वामी महाराजांच्या नुसत्या स्पर्शात किती अदभूत सामर्थ आहे याची प्रचिती सर्वाना आली .श्री स्वामी महाराजांची लिला अपरमंपार आहे .
     ।। श्री गुरूदेव दत्त.।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"