Sunday, March 24, 2019

शाकाहारी



🙏 श्रीगुरुदेव🙏

      एक गुरुदेवांच्या शेजारी एक गृहस्थ रहात होते. त्यांनी एक कुत्रा पाळलेला होता. त्या कुत्र्याला रोज मांसाहार लागत असे. एकदा त्या दादांना बाहेर गावी जायचे होते पण कुत्र्याला कोण सांभाळणार म्हणून त्यांनी गुरुदेवांना विचारले. गुरुदेव म्हणाले ठीक आहे ,आम्ही सांभाळू त्याला. तेंव्हा त्यांनी कुत्र्याला मांसाहार लागत असल्याचे सांगितले. गुरूदेव हसले आणि म्हणाले की काळजी करू नका. 2-3 दिवसांनी ते दादा परत आले आणि कुत्र्याला घेऊन गेले. त्याला खायला दिले पण कुत्रा काही केल्या खात नव्हता म्हणून येऊन त्यांनी सदगुरूंना विचारले की तुम्ही याला काय खायला दिले की हा मांस खायला तयार नाही. सदगुरू हसले आणि म्हणाले की मी तर फक्त दूध आणि भाकरी खायला घातली. जर दोन दिवस सदगुरूं बरोबर राहून प्राणी बदलू शकतात तर आपण का नको बदलायला. सदगुरू म्हणाले की उकळून गार केलेले पाणी जर आपण पितो तर ते पचायला चार तास लागतात. साधे पाणी पचायला आठ तास शाकाहारी जेवणाला बारा तास तर मांसाहार पचायला बहात्तर तास लागतात. मग आपणच ठरवायचे आपल्यासाठी काय योग्य आहे. सदगुरू म्हणाले की मातीमध्ये दोन खड्डे तयार करा. एका खड्ड्यात मांस आणि दुसर्‍या खड्ड्यात कोणतेही धान्य टाका. तीन दिवस त्याला पाणी घाला. चौथ्या दिवशी बघा धान्याला अंकुर फुटला असेल तर मांसामध्ये किडे पडले असतील. जेव्हा एखादा प्राणी मारण्यात येतो तेंव्हा त्याच्या मध्ये क्रोध आणि मरण्याची भिती यामुळे रासायनिक द्रव्ये तयार होतात जी आपल्यासाठी हानिकारक आहेत. जर आपण आपले कोणी नातेवाईक  मेल्यावर त्यांना किचन पर्यंत नेतो का? नाही, याउलट मारलेला प्राणी किचन मध्ये नेऊन शिजवून खाल्ला जातो. याहून अधिक सदगुरू म्हणाले  मांसाहार असो,व्यसन असो व नकारात्मक विचार ,यांचा त्याग करायलाच हवा.
      
      🙏श्रीगुरुदेव🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"