जी व्यक्ती राग, रुसवा धरून बसते, ती सहजा सहजी दुसऱ्यांना क्षमा नाही करू शकत।
त्यामुळं सगळ्यात वाईट गोष्ट अशी होते की त्या माणसाची कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्रातच अडकते।
मग तुम्ही कितीही उपासना करा, ध्यान करा, मंत्र जप करा...काय वाटेल ते करा, अजिबात उपयोग होत नाही कशाचाही।
दुसऱ्यांना माफ केल्यानं मूलाधार चक्र activate होतं ....अगदी आपोआपच होतं। activate झालं तरच ते pass होऊ शकतं।
गाडी चालूच नाही झाली तर पुढं तरी कशी जाणार बरं?
पुष्कळ लोक खूप उपास तपास करतात, उपासना करतात, तीर्थयात्रा करतात, पण...... पण एखाद्याला माफ करू शकत नाहीत।
त्यामुळं कितीही, काहीही केलं तरी कुंडलिनी शक्तीची गाडी काही हलतच नाही।
मग ओरडायला मोकळे सगळे....इतकं देवाचं केलं पण काहीच उपयोग होत नाही...कसा होणार?
प्रभू जिजस म्हणायचे की, शत्रू मध्ये ही तोच लपलेला आहे...तो कोण? तर ईश्वर। भगवान ओशो म्हणायचे की....राम मे राम देखा तो क्या देखा? रावण मे भी राम देखो, तो जाने।
अध्यात्मात मिळवणं सोपं असतं, पण मिळालेलं टिकवणं अतिशय अवघड असतं....
मुळात ते कुठं वाया जात नाहीय ना, हे ही कळत नाही, हीच तर मोठी घोडचूक होते।एका गुरुशिवाय हे कळायला काहीच मार्ग नसतो।
4get and 4give।
नाहीतर बसा मग एकाच वर्गात।👍🏻🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"