Wednesday, March 20, 2019

संत तुकारामांचा होळी विषयक अभंग

ग्रुपच्या सर्व सदस्यांना *|| होलिकोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ||*
*|| वसंतोत्सवाचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ||*
*|| धूलिकोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ||*
*|| रंगोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ||*

*तुका म्हणे दैन्य दुःख ...*
*दहन हे होळी होती दोष.*
*संत तुकारामांचा होळी विषयक अभंग.*
*मी होळीत काय आणि का जाळलं ?*
*याविषयी तुकोबाराय सांगतात,*
*दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं |*
*दहन हे होळी होती दोष || १ ||*
*सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी |*
*कोण यासी आणी दृष्टिपुढें || २ ||*
*आमुची आवडी संतसमागम |*
*आणीक तें नाम विठोबाचें || ३ ||*
*आमचें मागणें मागों त्याची सेवा |*
*मोक्षाची निर्देवा कुणा चाड ? || ४ ||*
*तुका म्हणे पोटीं सांठविला देव |*
*न्यून तो भाव कोण आम्हां ? || ५ ||*
*लोकं होळीत शेणाच्या गौऱ्या, लाकडं जळतात. "मी होळीत माझ्यातले 'दोष' जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही." दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही...१.*

*दुख्ख तर जवळ येतंच नाही, उलट सुख माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही." सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे. ....२.*

*मला सुखाची अपेक्षा का नाही ? तर, "संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे." .... ३.*

*"मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त 'संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव' एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील ?" .... ४.*

*"मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता?" सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको. ...५.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"