Monday, March 4, 2019

महाशिवरात्र आणि उत्तरायण

🙏 *महत्वाची माहीती* 🙏

🌹 *महाशिवरात्र* 🌹

शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु, माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात.  भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. या वर्षी म्हणजे २०१९ साली, *सोमवार दिनांक ४ मार्च २०१९ रोजी महाशिवरात्र आहे.*

महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. 

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.
हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे त्यांना 'यामपूजा' असे म्हणतात.

या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्‍ती होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्‍त होतो अशी श्रद्धा आहे.

भारतात अनेक शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा भारतात.

अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात.

*महाशिवरात्री' म्हणजे काय ?*

पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

*महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?*

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

*व्रत आचरण्याची पद्धत व विधी*
 
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी.

*शिवपूजेची वैशिष्ट्ये*
 
१) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. 
३) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
४ ) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. 
५ ) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. 

*महाशिवरात्रीला शिवाचा नामजपचे महत्त्व* 

महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा || नम: शिवाय || या शिवाचा पंचाक्षरी मंत्राचा जास्तीतजास्त करावा.

माघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी 'ॐ नमः शिवाय' ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात.

ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.

*महाशिवरात्रीची कथा.*

शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्या बद्दल 'शिवलिलामृत' मध्ये एक कथा आहे ती अशी की :

असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन्‌ शिकार मिळालीही नाही.

तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला "ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे."

हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.

तोच ते हरिण आले आणि म्हणाले, "पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…" इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. "त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे." तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.

एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले.

भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
------------------------------------------------------------
*#अध्यात्मिक माहीती तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा पुरोहित सेवा*

*9309580035 हा नंबर Purohit Seva नावाने Save करा व आपल्या Whatsapp वरून आपले नाव व शहर पाठवा.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"