कोल्हापूर हे जरी जगदंबेच प्रिय क्षेत्र असले तरी ही भगवान शिवांची तपस्थली देखील आहे त्याहून ही या क्षेत्री एक नियम आहे प्रत्येक देवतेने या क्षेत्री तप करावे एक शिवलिंग स्थापन करावे त्यामुळे या करवीरात शिवक्षेत्रांची मांदीयाळी च आहे त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण शिव स्थाने अशी-
*श्री मातृलिंग*
करवीर निवासीनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या दुस-या मजल्यावर असलेले हे लिंग म्हणजे साक्षात महालक्ष्मीचेच लिंगरूप म्हणून याला मातृलिंग म्हणजे मातेचे लिंगरूप म्हणतात.विशेष म्हणजे याला पूर्ण प्रदक्षिणा करतात.
*श्री काशी विश्वेश्वर*
काशी पेक्षा करवीर श्रेष्ठ आहे हे जाणून भगवान ईविश्वेश्वर काशी सोडून परिवारासह करवीरात आले.श्री महालक्ष्मीच्या आज्ञेवरून त्यांनी तिच्या उजव्या हाताला म्हणजे घाटी दरवाजा जवळ राहून भक्तांना मोक्ष देण्याची जबाबदारी सांभाळतात.
*श्री कपिलेश्वर*
कोल्हापूरचे ग्रामदैवत असे भगवान कपिलेश्वर ही विष्णूच्या 24अवतारापैकी एक असलेल्या महर्षी कपिलांनी स्थापन केले आहे. जवळ कपिलमुनींची माता व शिष्या अशा देवहुती मातेचही स्थान आहे. याच मंदिरात पूर्वी कोल्हापूर ची धर्म सभा बसत असे. कपिलतिर्थ मुजवल्यावर तेथे मंडई झाली आजही ती कपिलतीर्थ मंडई म्हणूनच प्रसिद्ध आहे.
*गायत्रेश्वर*
विद्यापीठ हायस्कूल च्या समोर असणारे हे लिंग म्हणजे वेदमाता गायत्री ची तपस्थली आणि तिचे लिंगरूप.
*महर्गलेश्वर*
इंदूमती हायस्कूल च्या आवारात कोप-याय असणारे हे शिवालय म्हणजे महालक्ष्मीचा प्रधान अशा बालशिवाचे देवालय.
*इंद्रेश्वर*
महाद्वार रस्ता दासराम बुक डेपो जवळ इंद्राने वृत्र हत्येचे पाप जाण्या करता तप केले
*चंद्रेश्वर*
शिवाजी पेठेत चंद्रेश्वर गल्लीत चंद्राने गुरूपत्नी अपहाराचे पातक जाण्यासाठी तप केले.
*सूर्येश्वर*
शिवाजी पेठेत महाकाली जवळ सूर्याचे तपस्थल
*ब्रम्हेश्वर*
निवृत्ती चौक शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्या जवळ देवीचा कथा वाचक.
*बुधेश्वर बृहस्पतिश्वर शुक्रेश्वर*
महालक्ष्मी मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या जवळ खत्री स्वीटस शेजारी या तिघांची लिंग रूपे.
*सर्वेश्वर*
पंचगंगा स्मशानभूमी जवळ करवीरातील सर्व देवांचे दर्शनाचे फळ देतो.
*त्रिसंध्येश्वर*
हत्तीमहाल रस्त्यावर
संध्यालोपाचा दोष दूर करून त्रिकाल संध्या वंदन केल्याचे पुण्य देतो.
*ऋणमुक्तेश्वर*
गंगावेश मंड़ई जवळ; सर्व ऋणातून मुक्त करतो
*तारकेश्वर*
श्री छत्रपतींच्या समाधी मंदिर परिसरात पंचगंगातीरावर ; रक्षण कर्ता
*रावणेश्वर*
मूळ रामेश्वर नाव शाहू स्टेडीयम जवळ प्रभू राम स्थापित.
*शूलेश्वर*
कोष्टी गल्लीत करवीरासुर मारून शंकरांनी त्रिशूल रोवला ती जागा शृंग ऋषींचे तपस्थान म्हणून शिंगोशी.
*करवीरेश्वर*
डाकवे गल्लीत करवीरासूराचा वध झालेले क्षेत्र
*अग्नीश्वर*
सिद्धाळा बागेजवळ अग्नीचे लिंगरूप
*लिंगेश्वर*
हुतात्मा पार्क मध्ये करवीरातील सर्व लिंगाच्या दर्शनाचे पुण्य देणारे स्थान .
नगरा बाहेर
पूर्व आळते रामलिंग
दक्षिण चक्रेश्वरवाडी चक्रेश्वर
पश्र्चिम कळे कल्लेश्वर
उत्तर मल्लिकार्जुन येडेनिपाणी
औरवाड अमरेश्वर
खिद्रापूर कोपेश्वर
यडूर वीरभद्र
संकेश्वर सिद्ध सांख्येश
बाजार भोगाव भोगेश्वर
वाटेगाव वाटेश्वर
बहे रामेश्वर
हरीपूर संगमेश्वर
याशिवाय अशी अनेक स्थाने आहेत सर्वांचा उल्लेख करणे निव्वळ अशक्य आहे. तरी ही सेवा गोड मानून घ्यावी ही विनंती
याशिवाय
करवीरची 12 ज्योतिर्लिंगे
श्रीलक्ष्मीविजय ग्रंथात कोल्हापूरातली बारा ज्योतिर्लिंगे दिली आहेत ती अशी
1) *महाकाल* - घाटीदरवाजा जवळ माऊली लाॅज मध्ये तळघरात
2) *ॐ कार अमलेश्वर* - गरूडमंडपासमोर दिपमाळेत
3) *सोमनाथ*
दिपमाळेत सिद्धिविनायका समोर
4) *नागनाथ* दिपमाळेत दत्तासमोर
5) *काशीविश्वेश्वर* -
घाटीदरवाजा जवळ मंदिर
6) *घृष्णेश्वर* पूर्व दरवाजा समोर खत्री स्वीट शेजारी *बुधेश्वर*
7) *त्र्यंबकेश्वर*- याच मंदिरासमोर *बृहस्पतीश्वर*
8) *केदारनाथ वैद्यनाथ* मंदीरामागे *शुक्रेश्वर*
9) *मल्लिकार्जून* राधेश्याम मंगल कार्यालयाच्या तळघरात
10) *भीमाशंकर कपिलेश्वर*
11) *रामेश्वर रावणेश्वर महादेव*
12) *वैद्यनाथ* - विद्यापीठ हायस्कूल राजाज्ञ वाड्या समोर दगडी चौखांबीत या प्रमाणे ही परीक्रमा करता येते
*श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः*
लेखक
*अॅड. प्रसंन्ना मालेकर, कोल्हापूर*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"