Friday, March 1, 2019

कलो श्रीपाद श्रीवल्लभ... दत्त उपासना का ?

कलो श्रीपाद श्रीवल्लभ... दत्त उपासना  का ?

 ''आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद वल्लभांची आराधना करावी ? देव श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळे आहेत ? या बद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावे '' यावर नामानंद म्हणाले, ''एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली. 
काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला गेले. मुलीची सासू म्हणाली ''तुमची बहिण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, लोणी, तूप ती चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती परंतु इतक्या चोऱ्या ?'' तेंव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला ताई तू चोरी करणे सोडून दे.
 तू केवळ दूध घेत जा म्हणजे तुझी सासु रागावणार नाही दूधात सर्व काही असते. या प्रमाणे एकटया श्री दत्ताची आराधना केल्यास सर्व कांही मिळते. 
लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळया देवांची आराधना करतात.
 शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाहीत तसेच विष्णूंच्या पुजेने शिव प्रसन्न होत नाही. सगुण आणि साकार देवांची पूजा केल्याने भक्ताच्या कर्माप्रमाणे फळ मिळते. अनेक जन्मातील केलेल्या पाप-पुण्याचे फळ क्षीण स्थितीत असेल तर पुण्य महाविशेष मध्ये जमा होते. 
यावेळी श्रीदत्तप्रभूंची भक्ति प्राप्त होते. अशा भक्ताला सर्वसिध्दि प्राप्त होतात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. अपरिपक्व अवस्थेत असताना महायोग शक्तीने जीवात प्रवेश केल्यास शरीर, मन, बुध्दि त्या शक्तिस सांभाळू शकत नाहीत आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखे वाटते. 
जीवाचे जीवनमान सुरळित चालण्यासाठी भगवान विष्णु आपणास सहाय्य करतात, ते प्रत्येकाच्या कर्मानुसार. श्रीकृष्ण श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता. हे सर्वाना ज्ञात आहेच, गोकुळातील साऱ्या गोपी आणि गोप पूर्व जन्मातील महान महान ऋषि होते. त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वत रूपाने अवतरित झाले होते. 
या महान ग्रंथांचे विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ति निघते तेंव्हा जीवास खूपच हलके हलके वाटते. या सूक्ष्मस्थितित जीवाला महायोगानंद मिळतो. हा मिळविण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा , आश्रितांचा संपूर्ण भार स्वत: पेलून घेतात.
 त्यांचे ग्रंथि विभेदन करून त्यांना शक्ति प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. बौध्दिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्त प्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचे, परिणाम क्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते श्री विष्णूंना देत असत. 
या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी, त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसहय होत असत. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात. श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारूण्य मूर्ति आहेत ! श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष्य त्यांच्या बरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांनी एक लाख पंचविस हजार अनुयायी करण्याचा संकल्प केला होता.
 त्याची पूर्तता करणे हे होते. ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून, रुद्राच्या अंश रूपाने प्रकट होऊन कोटयान् कोटी जन्मानंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ति देतात. त्यांच्या मधील ब्रह्मा, विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. हे त्या त्या आत्म्याच्या संकल्पाने होत असते.
 भक्तांनी संकल्प सिध्दिसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकदा पिठापुरम् मध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास , घोडयावर बसत असता घोडयाने पाडून टाकले व पायाने तुडविले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादानी आपला अभय हस्त दर्शविला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या. 
जणु कांही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांवर दृढ श्रध्दा आणि भक्तीभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसतांना शंभर मोहरांनी भरलेला एक हंडा सापडला. श्री वेंकट अप्पयांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले,''मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य वीस वर्षानी वाढविले.
 त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिले होते. आज त्याला शंभर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला हा त्याचा महत् भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ति असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकपती परमेश्वर सुध्दा अशा भक्ताच्या आधिन होऊन त्यांच्या बरोबरच संचार करतात.''

श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी ''सिध्दमंगल'' स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरण दृष्टया कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठन करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. 

सिध्दमंगलस्तोत्र

1) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

2) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

3) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

4) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

5) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

6) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

7) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

8) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

9) पीठीकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

परम पवित्र अशा सिध्दमंगल स्तोत्राचे पठन अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सद्ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिध्द पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठनाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठन करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्यास सिध्दी प्राप्त होतात.''

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"