#भगवद्गीता
अध्याय दुसरा सांख्ययोग
ओवी १ ली
सञ्जय उवाच !
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् !
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन: !!१!!
अर्थ:--संजय म्हणाला, करूणेनेे व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या ,व ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत ,अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे म्हणाले .
तात्पर्य :--भौतिक गोष्टींविषयी करुणा ,शोक ,आणि अश्रू हि सर्व सत्य अशा आत्म्यासंबंधी च्या अज्ञानाची लक्षणे आहेत .शाश्वत आत्म्याबद्दल ची आस्था ही आत्मप्रचीती होय .या श्लोकातील मधुसूदन हा शब्द अर्थपूर्ण आहे. भगवान कृष्णाने मधु दैत्याला ठार मारले .आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने अर्जुनाला घेरले आहे, त्या अज्ञानाचा नाश श्रीकृष्णाने करावा अशी अर्जुनाची इच्छा आहे .करूणेचा उपयोग कुठे करावा हे कोणाला समजत नाही .ही बुडणाऱ्या मनुष्याच्या पोषाखा बद्दलची करुणा व्यर्थ आहे .पाच भौतिक शरीर हा मनुष्याचा बाह्य पोशाख आहे ,जो मनुष्य अज्ञानाच्या महासागरात पडलेला आहे त्याच्या केवळ बाह्य पोशाखाचे रक्षण केल्याने त्या मनुष्याचे रक्षण होत नाही. ज्या मनुष्याला याचे ज्ञान नाही आणि म्हणून केवळ बाह्य वेशा बद्दल जो शोक करतो त्याला शूद्र किंवा निष्कारण शोक करणारा असे म्हणतात. अर्जुन तर क्षत्रिय होता व म्हणून अशी वागणूक त्याच्याकडून अपेक्षित नव्हती. तथापि भगवान श्रीकृष्ण हा अज्ञानी मनुष्याच्या शोकाचा नाश तर करतोच आणि या कारणास्तव त्याने भगवत गीता सांगितली आहे .या अध्यायात भौतिक शरीराचे विश्लेषणात्मक विवेचन करून आणि आत्म्याचे स्वरूप विशद करून परम प्रभू भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आहे कर्मे करीत अध्यात्माच्या दृढ विचारांमध्ये स्थिर राहणाऱ्या मनुष्याला आत्मज्ञान होणे शक्य आहे.
ओवी २री
श्री भगवान उवाच ! कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् !
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन !!२!!
अर्थ:-- परम पुरुष श्री भगवान म्हणाले ,हे मत्प्रिय अर्जुना! अशा या अशुद्ध गोष्टी तुझ्या मनात कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या प्रगतिशील मूल्यांचे ज्ञान आहे ,त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत .त्या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकांत येणाऱ्या नाहीत तर त्या त्याच्या दुष्किर्तीला कारण होतात .
तात्पर्य :--श्रीकृष्ण आणि भगवान हे एकच आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि जे श्रीकृष्ण तेच भगवान आहेत म्हणून गीतेमध्ये सर्व ठिकाणी श्री कृष्णाचा उल्लेख भगवान असाच केला आहे .परिपूर्ण सत्यामध्ये भगवान हाच अंतिम किंवा निर्णयात्मक सत्य आहे .अशा परिपूर्ण सत्याचा साक्षात्कार किंवा अनुभव हा जाणिवेच्या तीन स्वरूपात होतो .म्हणजे ब्रम्हात किंवा निर्विशेष सर्वव्यापी आत्म्याच्या ठिकाणी ,परमात्म्यात किंवा सर्व जीवांच्या हृदयात समाविष्ट असणाऱ्या परमेश्वराच्या ठिकाणी, आणि परम पुरुष भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी!
श्रीम भागवतात या परम सत्याचा विचार याप्रमाणे सांगितला आहे.
वदन्ति तत्तत्वविदस्तत्त्वं यज्ज्ञानमद्वयम् !
ब्रम्हेति परमात्मेति भगवानिती शब्द्यते !!
परम सत्याच्या ज्ञात्याला जाणिवेच्या 3 स्वरूपात परम सत्याचा साक्षात्कार होतो किंवा अनुभव येतो. आणि ही सर्व स्वरूपे एकच आहेत .परमात्म्याच्या तीन स्वरूपांना ब्रह्म ,परमात्मा ,आणि भगवान असे म्हणतात. ही तीन दैवी स्वरूपे सूर्याच्या उदाहरणांवरून स्पष्ट करता येतात. कारण सूर्याची सुद्धा तीन विविध स्वरूपे आहेत . एक, सूर्यप्रकाश ,दुसरे -सूर्याचा पृष्ठभाग ,आणि तिसरे स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष सुर्य हा ग्रह! जो फक्त सूर्यप्रकाशाचा अभ्यास करतो तो प्राथमिक अवस्थेतला विद्यार्थी होय. ज्याला सूर्याच्या पृष्ठभागाची माहिती झाली आहे तो जास्त पुढारलेला किंवा प्रगती करणारा विद्यार्थी होय. आणि जो सूर्य ग्रहात प्रवेश करू शकतो तो सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होय .सामान्य विद्यार्थ्यांना नुसते सूर्यप्रकाशाचे म्हणजे त्याच्या विश्वव्यापीत्वाचे आणि त्याच्या निर्विशेष स्वरूपाच्या नुसत्या झगझगीत तेजाचे ज्ञान झाले म्हणजे त्यांना समाधान होते .अशा विद्यार्थ्यांची तुलना ज्यांना परम सत्याच्या केवळ ब्रह्म स्वरूपाचे ज्ञान झाले आहे अशा लोकांशी करता येईल .ज्या विद्यार्थ्याने त्यापेक्षा अधिक प्रगती केली आहे त्याला सूर्यबिंबाचे ज्ञान होते. अशा विद्यार्थ्यांची तुलना परम सत्याच्या परमात्म स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झाले आहे अशा लोकांची करता येईल येईल .आणि जो विद्यार्थी सूर्य ग्रहाच्या अंत: प्रदेशात प्रवेश करतो अशा विद्यार्थ्यांची तुलना परमश्रेष्ठ सत्य अशा भगवंताच्या सगुण स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झाले आहे अशा लोकांची करता येईल ; म्हणून जे भक्त असतात किंवा परम सत्याच्या भगवत स्वरूपाचे ज्ञान त्यांना झाले आहे ते सर्व श्रेष्ठ योगी होत. जरी सर्व साधक एकाच परम सत्याच्या तत्त्वचिंतनात मग्न झालेले असले तरी जे भक्त आहेत किंवा परम सत्याच्या भगवत स्वरूपाचे ज्ञान झाले आहे ते सर्व श्रेष्ठ योगी होत जरी सर्व साधक एकाच त्याच्या चिंतनात मग्न झालेले असले तरी जे भक्त आहेत किंवा परमसत्याच्या भगवत स्वरूपाचे ज्यांना ज्ञान झाले आहे ते सर्व श्रेष्ठ योगी होत ! सूर्यप्रकाश, सूर्यबिंब ,आणि सूर्याचे अंतरंग हे एकमेकांपासून जरी अलग करता येत नाहीत तरी ; या तिन्ही विविध स्वरूपांचे जे अभ्यासक आहेत ते एकाच प्रकारचे नसतात.
व्यास देवांचे पिता ,महान अधिकारी असे जे पराशर मुनी, यांनी भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण केले आहे जो सर्व ऐश्वर्य ,सर्व बल,सर्व सौंदर्य ,सर्व ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त आहे तो परम पुरुष भगवान होय! पुष्कळ लोक असे आहेत की जे फार ऐश्वर्यवान किंवा संपत्तिमान आहेत ,फार बलशाली आहेत ,फार सुंदर आहेत,फार यशस्वी आहेत ,फार विद्वान आहेत, किंवा फार ज्ञानी आहेत .आणि बरेचसे अनासक्त आहेत. परंतु समग्र ऐश्वर्य किंवा संपत्ती ,समग्र बल इत्यादिकांनी संपूर्णपणे कोणी युक्त आहे असे कोणालाही म्हणता येत नाही .फक्त श्रीकृष्णच असे म्हणू शकतात, कारण ते उपर्युक्त वर्णन केल्याप्रमाणे भगवान आहेत.श्री ब्रह्मदेव,श्री शिव, श्री नारायण यांसह कोणताही जीव श्री कृष्णाइतका संपूर्ण ऐश्वर्य युक्त नाही .म्हणून ब्रह्म संहितेत स्वतः श्री ब्रह्मदेवाने असा निष्कर्ष काढला आहे की, श्रीकृष्ण हेच भगवान आहेत .भगवंता समान ,किंवा भगवंता हुन श्रेष्ठ असा दुसरा कोणीही नाही .तोच अनादि भगवान आहे .त्यालाच गोविंद असे म्हणतात. आणि तोच सर्व कारणांचे परमश्रेष्ठ कारण आहे.क्रमश:
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"