श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .
स्वामी महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा ऊपदेश
स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभस्वामी महाराजांच्या आज्ञेने श्री क्षेत्र कुरवपूर ईथे आले .त्यांनी प्रथम श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या आसनाला वंदन केले .कुरवपूरात
दोनच ब्राम्हणांची घरी परंतु त्यांचे आचार विचार वर्तन बरोबर वाटत नसल्याने स्वामी महाराजांना तिथे राहावेसे वाटेना पण देवांची आज्ञा .द्विधा अवस्थेत झोपी गेले .
झोपेत श्रीपाद श्रीवल्लभस्वामी स्वप्नात आले
म्हणाले की ही भुमी रजकभक्ताने मला दिली त्याच्या ऊत्पन्नातून तेथिल नैवेद्य व नंदादीप चालू आहे आपण पूजार्याच्या आचाराकडे लक्ष देऊ नका येथे भिक्षा घेण्यास आपणास हरकत नाही त्यांची भावशुध्दी चागंली असल्यामुळे त्यांचे हात आम्हास चालतात तर आपणास का चालू नये पण या पुढे आपण कुणासही आपल्या पायाचे तिर्थ देऊ नये व अनधिकारी माणसास मंत्र ही देऊ नये .येथे येणार्या प्रत्येक साधकाने गाणगापूर व नरसोबाची वाडी या स्थानी वागतात त्याप्रमाणे शुचितेने वागावे असा ऊपदेश करावा .
स्वामी महाराजांना जेव्हा जाग आली तेव्हा त्यांच्या मनातील सारे द्वंद्वे विरघळून गेली आणि स्वामी महाराज या पुढे पुजार्या कडे निशंःक मनाने भिक्षा घेऊ लागले .
।। श्री गुरूदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"