Saturday, March 23, 2019

श्रीपादश्रीवल्लभ आणि गोकर्ण स्थान

" *श्रीपादश्रीवल्लभ आणि गोकर्ण स्थान "*
[
भारतात अनेक तीर्थस्थाने आहेत पण भगवान दत्तात्रयांनी गोकर्ण स्थानच निवडले ,शिवांच्या या  मूळ स्थानातच  त्यांनी कार्यारंभी निवडले .हा समुद्र वलयांकित असा भाग आहे, येथे स्वयंभविय पुरातन लिंग आहे. साध,क योगीजन यांना मार्गदर्शन महिमा शांभवी योगमार्ग या करिता यांचे महत्त्व आहेत . त्रिभुवनात हे दुर्मिळ असे महाबळेश्वर आत्मलिंग येथे आहे विष्णूच्या आज्ञेने गणेशाने ते स्थापन केलेले आहे .रावणाने मातेच्या उपासने  करिता आत्मलिंग आणले .ते स्थान लोककल्याणा कामी अग्रेसर ठरले।रावणाच्या त्या सर्वश्रुत कार्याची आठवण सनातन काळापासून आहे.हे रहस्यमय असे बनलेले आहे. रावणाने कैलासावर नानाप्रकारे शिवाची आराधना केली संगीताने आळवणी केली. शेवटी त्या सेवेने शिव प्रसन्न झाले भोळ्या शंकराने आत्मलिंग प्रदान केले ही घटना नारद मुनींनी देवलोकात कथन केली .इंद्रादि देव चिंतातूर बनले शेवटी भगवंतांना एक योजना करावी लागली विष्णूने ते कार्य गणपतीकडे सोपविले आणि गणपतीने मोठ्या कुशलतेने ते काम पूर्ण केले.अाणि रावणाने त्याच्याकडे दिलेले आत्मलिंग धरणीवर ठेवले जातात ते कायमचे रुतून बसले व तेथेच राहिले ते हे स्थान आहे.
 ते लिंग जमिनीवर न ठेवण्याची सूचना शंकराने केलेली होती. रावणाच्या वाटेत अवरोध करण्याचे कार्य नारदांनी केले होते शेवटी हताश बनलेल्या रावणाने बळाने लिंग उपटण्याचा यज्ञ  केला पिरगळून जोर लावल्याने ते तर निघाले नाही ,पण त्याचा  आकार गोकर्णाचा  झाला. त्या लिंगाचे  रहस्य  सांगण्याचे निमित्त करून नारद आणि रावणास थोपवून धरलेले होते . विष्णूने चक्र सोडून सूर्यास्ताचा भास निर्माण केला होता. आणि सांय    सधेसाठी रावण थांबला होता .त्या  उपासने करिता रावणाने आत्मलिंग बटू रूपाने आलेल्या गणपतीच्या हाती देताच ती संधी साधून ते कार्य साधले. अशी युक्ती पूर्ण योजना देवांनी केली व ती सफल झाली .निराश झालेला रावण पुन्हा तप करण्यास गेला लिंग मात्र गोकर्ण रूपाने कायमचे तेथे राहिले .समस्त देव आणि ऋषिगण पूजनास तेथे आली समुद्र किनारी हे महान क्षेत्र निर्माण झाले .स्कंदपुराणात याबद्दल बरीच माहिती नमूद झालेली आहे.सर्व पुराणात स्कंदपुराण विस्ताराने खूप मोठे आहे .त्यातील कथा उद्बोधक अशा आहे. अशा स्थानात श्रीपाद वास करून होते.येथे पूर्वकाळात कुणा कुणाचा उद्धार झाला याची माहिती सिद्धांनी नामधारका कथन केली आहे.(विशेष माहिती:-  गोकर्ण महाबळेश्वर मंदिरातील श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना "परमपूज्य कलावती यांच्या आई कडन झाल्याचे समजते व गोकर्ण गावात श्री आंबेकर यांचे जे घर आहे त्या घरात श्रीपाद श्री वल्लभांच्या मूळ  पाषाण पादुका आहेत .असे समजते.)

गोकर्ण स्थानाचा प्राचीन इतिहास पण तेवढाच महत्त्वाचा आहे तसाच वेधक असा आहे आदी युगापासून हे पवित्र स्थान मानलेले आहे स्कंद पुराणात तो सारा भाग   ग्रथीत झालेला आहे  येथे वास केलेल्या "तांब्रगौरी"  देवी पार्वतीने या स्थानाची तुलना  वाराणशीसी  केलीली आहे प्रभू रामचंद्रांनी पण ब्रह्महत्या पातक नाश करिता येथे अनुष्ठान केले होते कालिदासाने आपल्या रघुवंश काव्यात येथील वर्णन दिले आहे अयोध्येचे आज महाराज काली म्हणजेच इस:वीसन पूर्वी ६६० व ६६४ काळात श्रीह्रप रचना याच परिसराची माहिती देणारी आहे कदंब वंश  राजांचे पण हे स्थान पूज्य असे होते हिंदू साम्राज्याचे राजे लीकडील काळात शिवछत्रपती यांनी पाण्या स्थानाचा आदर केलेला आहे। याशिवाय पुराण वाङ्मयात अन्यत्र बरीच माहिती लाभते रुद्राच्या प्रसादाने हे स्थान पुण्यपावन बनलेले आहेत या जागी रुद्र पाताळातून वर आले त्यावर लिंग स्थापन झाली त्या स्थानास आधी गोकर्ण म्हणतात।  यावरून आत्मलिंग स्थापनेपूर्वीपासून हे पुरातन शिवस्थान आहे त्यामुळेच गणपतीच्या हस्ते आत्मलिंग स्थापण्याचा योग आला येथे "कोटीतीर्थ" आहेत त्याच्या दक्षिण भागावर अगस्ती मुनींचे तपस्या स्थान  आहे येथे  वद्धेश्वर   लिंगाच्या जवळ गरुडाच्या तपाची जागा "गरुड मंडप "आहे या जागेत केलेल्या अनुष्ठानाने त्वरित सिद्धी मिळते असे म्हणतात।  येथील समुद्र दर्शन व पूजन पुण्यकारक आहे समुद्रामुळे आत्मलिंग येथे या गोकर्णा वास करून राहण्याचा योग आला  भू कैलास असे नाव मिळाले समुद्र नाथाने तपाने येथे अमरेश्वर लिंग निर्माण केले त्याचे मनोरथ पूर्ण झाले शंकराच्या अज्ञाने दुर्गादेवी येथे वास करू नाही येथे रक्षणाकरता ती "भद्रकाली" म्हणून प्रवेशद्वारात आहे येथे जटायू तीर्थ ,विरेश्वर, व्यंकटेश्वर, हनुमान, विशाल बिल्व, शतबधू, सहस्त्र बिंदू ,सुब्रमण्यम, कल्लेश्वर, गायत्री, शाळवी, यंत्र  इत्यादी महत्त्वाची स्थाने आहेत ही सर्व स्थाने गोकर्णाच्या पंचक्रोशीतील आहेत  लक्ष्मी व्यंकटेश मंदिर गोकर्णाच्या वाटेवर आहेत    रावणाच्या  हातून आत्म लिंगाचा प्रवास होत असताना "श्रीक्षेत्र नृसिंहवाडी" येथे त्यात आत्मा लिंगाचा मूळ गाभा निखळून पडला  ते स्थान म्हणजे तेथील अमरेश्वर देवस्थानाचे स्थान आहे  तेथे "६४" योगींनी वास करू नाहीत वाढीच्या नदीच्या पैल तिरावर हे स्थान आहे रावणाच्या हाती केवळ कवच उरले होते ते योजनाबद्ध कार्याने देवांनी गणपतीच्या हस्ते गोकर्ण येथे स्थापना केली या कारणामुळे वाडी येथील अमरेश्वर स्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण असे ठरते कालच्या पोस्टमध्ये उल्लेख केल्या प्रमाणे येथे आंबेकर नावाचे घराणे आहे, त्या घरात श्रीपादाच्या पादुका   असून वंशपरंपरेने तेथे पूजा चालू आहे त्या पादुका दगडी आहेत तेथे आलेला भक्त दर्शनास आवर्जून तेथे जातो                          

॥श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"