कठोर तपश्चर्या करणारे रावण, पराशर,विश्वामित्र,हिरण्यकश्यपू यांनाही परमेश्वराच्या गन्तव्य स्थानापर्यंत पोहोचायला खूप वासनांचा सामना करावा लागला.जमदग्नी,दुर्वास तर धडधडच वाढवतात.निर्विकार,निरपेक्ष,निश्चल उपासनेसाठी परमेश्वराच्या चरित्राची गोडी लागली,मन शुध्द झाले,हृदय भक्तीने ओथंबून गेले की ध्यान लवकर लागते.किती लक्ष जप झाला यापेक्षा जपात किती लक्ष होते हे महत्वाचे असते.*एका न मागता देणे,एका मागता न देणे*अशी प्रचिती म्हणून येते.भर दिवसा सूर्यास्तासारखा अंथार करण्याची आध्यात्मिक ताकद असणारे पराशर क्षुल्लक वासनेपोटी धीर कन्येच्या मोहात फसले.त्याच वासनेमुळे विश्वामित्रांची समाधी भंग पावली.रावणाचेही फार वेगळे नाही.हिरण्यकश्यपू तर साक्षात दुराभिमानी अहंकार.कठोर तपश्चर्येने साक्षात ब्रह्मदेव प्रसन्न झाले.मुक्ती मागून घेण्याऐवजी वर मागितला की मला दिवसा मरण नको,रात्री नको.आत नको,बाहेर नको.शस्त्राने नको,अस्त्राने नको.माणसाकडून नको,पशूकडून नको.ब्रह्मदेव *तथास्तु* म्हणत गेले.आणि मग हिरण्यकश्यपूला वाटले आपण अमर झालो.बेफ़ाम आणि बेतात अहंकारी झाला.ज्या परमेश्वराने वर दिला त्याचाच द्वेष करू लागला.परमेश्वराला घाई नसते.सुधारण्याची खूप संधी देतात.नारायण भक्त आपल्या मुलावरच अनन्वित अत्याचार करू लागल्यावर सर्व अटी सांभाळून श्रीविष्णुंनी आपला चौथा अवतार घेतला."नराचा देह,सिंहाचे मुख."नरसिंहानी तीन्ही सांजेला,उंब-यावर,नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट विदीर्ण करून आतडी बाहेर काढली.पंतप्रधान प्रसन्न झाल्यावर खासदारकी मागायची तर बाथरुम मधला सव्वा इंची नळ दीड इंची करून मागितला.म्हणून स्वच्छ अंतःकरण स्वच्छ नसताना केलेली उपासना फळूच शकत नाही.आधी परमेश्वराच्या प्रेमाने आपली मिराबाई होऊ द्या.मग गिरीधर जवळच आहेत.🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"