पहाटे पाच वाजता गर्भालयाचे दार उघडतात. भूपाळी स्वरात उठवण्याची गाणी गातात आणि काकड आरती करतात नंतर श्रींच्या वस्तू आणि अलंकार काढून पुजारी आणि सेवेकरी गुरु पीठाला षोडशोपचार पूजा करतात पुजारी शिवाय गर्भालयात जाण्यास इतरांना जाण्यास मज्जाव अाहे. पुजारी मार्फत अभिषेक वगैरे विशेष प्रकारची पूजा करविणे शक्य आहे.येथील नियमांना अनुसरून ही महापूजा आणि इतर सेवा कार्य करावी लागतात पुजारी लोक सकाळी "आठ वाजता" रुद्राभिषेक सुरू करतात दोन प्रहरी नैवेद्य आरती होऊन सकाळचा कार्यक्रम समाप्त होतो .सायंकाळी साडेसात ते साडेआठपर्यंत धूप, भजन, आरती ,आणि मंत्र पुष्प असा कार्यक्रम असतो दुपारच्या प्रमाणे श्रींची उत्सवमूर्ती गणपती बाहेरील अश्वत्थ, हनुमंत, आणि शिवलिंग यांनाही आरती होते रात्री शेवटी श्री श्रीपाद स्वामींना झोपण्याची तयारी झाल्यानंतर गर्भाला कुलूप घालतात नित्य नैमितिक सेवेच्या वेळी उपयोगात आणली जाणारी भजन आरती प्रार्थना अष्टके इत्यादी शेवटी दिली आहेत . श्रीपाद श्रीवल्लभ जयंती -भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी ही श्रींची जन्मतिथी यानिमित्त अभिषेक महापूजा नैवेद्य वगरे होतात अभिषेक झाल्यानंतर बारा वाजता श्रीपाद स्वामींची मूर्ती पाळण्यात घालून नाव ठेवतात त्यावेळी जमलेले लोक नाम करणाऱ्या पुजाऱ्यांची पाठ पाठ थोपटतात त्या दिवशी दुपारी भक्तांना महाप्रसाद मिळतो त्या दिवशीचा खर्च भक्तांकडून चालतो .
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"