भगवंताकडे करावयाचा प्रवास म्हणजे दैहिक प्रवास नसून तो प्रवास म्हणजे अंतरिक प्रवास उर्फ मनाची जडणघडण करणे होय. वासनांचा प्रवास भोगाकडे नव्हता विज्ञान विषयी त्यांच्यात ओढ निर्माण करणे म्हणजे भगवंताच्या मार्गावरील प्रवास होय जीवाची उत्पत्ती व विश्वाची ही उत्पत्ती वासनेतूनच झाली आहे. अशा अवस्थेत वासना म्हंटली की तृप्तीची इच्छा होतेच. परंतु मूळ विषयच असा आहे की जे निपजले आहे, उत्पन्न झालेले आहे त्या सर्वांचाच नाश ठरलेला आहे. भोगा-- नंतर होणारी तृप्ती ही तात्पुरती व म्हणूनच विनाशी आहे. जीवावर दोन महान गोष्टी आपली सत्ता गाजवत असतात त्यांतील माया ही एक शक्ती असून विक्षेप ही दुसरी शक्ती आहे
. माया व विक्षेप यांच्या कोर्टात भगवंताकडे प्रवास करत असताना जे अडथळे निर्माण होतात ते सर्वच सर्व अडथळे दडलेले आहेत. जगातील यच्चयावत वस्तू एकमेकांना आकर्षित करतात. हे आकर्षण मानसिक स्तरावर जितक्या प्रबलतेने कार्य करील तितक्या प्रमाणात जीव हा बध्द होत असतो. आणि म्हणूनच विश्वाच्या पसाऱ्याला ज्ञानी लोकांनी मायेची उपाधी असे म्हटले आहे. जीवाच्या बौद्धिक स्तरावर होणारी जडणघडण ही त्याची विक्षेपशक्ती वाढवते व त्यायोगे आत्मदर्शनाच्या कामात विलक्षण अडथळा निर्माण होतो. हा अडथळाही बध्दतेला कारणीभूत होतो. भगवन्मार्गावरील प्रवास हा सुखकर व उत्तम व्हायचा असेल तर त्यासाठी साधकाने अंतरिक स्तरावर कठोरतम होणे आवश्यक आहे. व्यवहारातील अनुकूल अथवा प्रतिकुल संवेदना झेलण्याचा त्याने अभ्यास केला पाहिजे. या अभ्यासाचे जे मार्ग आहेत त्या मार्गानाच कोणी योगमार्ग कोणी त्या क मार्ग कोणी ज्ञानमार्ग कोणी भक्ती मार्ग कोणी कर्ममार्ग अशा विविध नावाने संबोधतात. ईश्वराकडे जाण्याच्या सर्व मार्गांमध्ये विलक्षण धागा कार्यरत असल्याशिवाय जीवाची आणि शिवाजी भेटच होत नाही. भगवंताला आठवण्याची क्रिया करणे याचा अर्थ भगवंताच्या स्थितीत राहणे असाच होय. ईश्वराच्या विस्मरणात राहणे याचा अर्थ मायेच्या अधिपत्याखाली राहणे असा होय निश्चयाने व हट्टाने साधनेची जोपासना केल्यास ईश्वर मार्गातले वर निवेदन केलेले अडथळे विकल होत होत पुढे कायमचे नष्ट होतील साधकाची मूळ अवस्था बद असते त्यातून त्याच्या ठिकाणी मुख्य तत्त्व म्हणजे आत्म्याला जाण्यासाठी इच्छा निर्माण होते व पुढे तो साधक होतो व त्याही पुढचा प्रवास केल्यास तो सिद्ध म्हणजे वस्तुरूप होतो वस्तुरूप होणे म्हणजेच विश्वरूप होणे असे झाल्याने संशय नाहीसे होऊन त्याच्या ठिकाणी ईश्वरनिष्ठा अशा स्वरूपात सिद्ध होते व म्हणूनच त्याला सिद्ध असे म्हणतात.
( शरद उपाध्ये गुरुजी )
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"