कलि काळात धर्म व आचार लोप पावले आर्य वर्तूातून चारी वेद विद्धजन गेले वैदिक धर्म चिन्ह विछिन्न झाला कलीचा प्रभाव वाढत गेला त्या वेळेस दत्ताचा अवतार झाला भक्तजन तारण्यास व भक्त हितार्थ अवधूत मुनिजन यांना सावरण्यास ही योजना होती म्हणून श्रीगुरु भक्तांच्या भुवनी अवतरले .पूर्व देशीच्या पिठापूर भागात आपस्तंभ शाखेच्या उत्तम वंश होता, गोत्र विधी सहीत आपळ राजा नावाच्या व त्याची भार्या सुमती यांच्या पुण्याईने व त्या दाम्पत्याच्या भावभक्ती आचार ,विचार ,अतिथी ,सत्कार या श्रेष्ठ गुणामुळे त्या घरी दत्त अतिथी म्हणून आले त्यादिवशी अमावास्या श्राद्ध प्रसंग होता स्वयंपाक करून ब्राह्मणांची वाट पाहत होते अंगणात उभे असलेल्या येथील ब्राह्मण जेवण्यापूर्वी मातेने भिक्षा वाढली कुठला अन्य विचार केला नाही त्यामुळे प्रसन्न झालेल्या दत्तांनी प्रत्यक्ष दर्शन दिले आणि वर दिला तिने म्हटले आपण मला माता म्हणून संबोधले ते बोल खरे व्हावेत मला संतती झाली पण ते लुळे पांगळे अल्पाआयू असे झाले काही उपजत जात राहिले त्यांनाच मी साभालावे असे मी अनुभवत आहे . जन्म व्यर्थ बनून भाेग भोगीत आहे तर मला आपल्यासारखा प्रज्ञावंत, पुराणपुरुष , जगतवद्य, असा पुत्र द्या .आणि दत्तात्रयांनी तथास्तू म्हटले व ते अंतर्धान पावले . आपळ राजा म्हणतात स्वतः दत्तांनी येथे घरी भिक्षा घेतली दत्त माध्यमांनी येतात ते प्रेमाने व श्रद्धेने वाढावी ते नाना परिदान रूपाने येतात सुमती राणी म्हणते मी अवज्ञा केली ब्राह्मण न जेवता भिक्षा वाढली तर पती म्हणतो आज माझे पितर तृप्त झाले कारण प्रत्यक्ष दत्तांनी घरी येऊन भिक्षा घेतली आपले भाग्य फार मोठे आहे अमावस्येची महापर्वणी साधली आमचे सर्व पितर आज मुक्त झाले साक्षात" विष्णू दत्त" येथे येऊन गेले जेवले त्या त्यांनी वर दिला तथा यथासमय पुत्र जन्माला आला तो काळ शके ११२० चा काल ठरतो जन्मनाव "राजराजेश्वर" देव चित्रा नक्षत्र सूर्योदय काल काल युक्त नाम संवत्सर दक्षिणायन भाद्रपद शुद्ध चौदा तिसरे चरण असा जन्म काळ आहे वेस्ट गोदावरी जिल्ह्यात येअरदिली- पेरीवार जवळ अमरापूर नावाचे स्थान आहे तेथे स्वयंभू गणेश आहे त्या गणेशाचा प्रसाद सुमती राणीस लाभला होता त्यामुळे श्रीपादा चा जन्म गणेश चतुर्थीस झाला असे म्हणतात.
॥श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये॥
॥श्रीगुरुदेवदत्त॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"