Friday, March 29, 2019

भगवंताकडे काय मागावे

सामान्य माणसाला भगवंताकडे काय मागावे , किती मागावे याचे भान राहात नाही .तो पहाटे उठल्यापासून काहीतरी मागत राहातो ! तुम्ही अवश्य त्याच्याकडे मागा , पण कर्मफलाची प्राप्ती न झाल्यास त्याला दोष देण्याऐवजी आपल्या कर्मातील दोषांचा आधी विचार करा, म्हणजे ईश्वरी सूत्र तुमच्या आपोआप लक्षात येईल .आपण मूलत: दु: खसागरात जन्म घेतलेली माणसं , थोडफार सोसलच पाहिजे . तुमचा भाव जर त्याचे ठायी उत्तम असेल , तर तुम्ही त्यातूनही तरून जाल . हा शब्द मी त्याच्या वतीने तुम्हाला दतो . तुम्ही चिंता करण्याचे कारणच नाही .
     भगवंत ज्यांना मोक्ष देतात त्यांना एकरूप करून घेतात .ज्यांचा वध केला त्यांना सद् गती देतात .रावण , कंस यांना भगवंतांनी सद् गती दिली.
भगवताच्या या लक्षणाचा विचार केला तर ते उध्दारकर्ते आहेत .कुणाला बुध्दी देतील ,कुणाला सद्गती देतील , कुणाला ऐश्वर्य देतील !
।।श्री गुरुदेव दत्त ।।
🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻
🌻🌻🌻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"