Wednesday, March 20, 2019

कृत्रिम रंगांचा तिटकारा

आईचे वात्सल्याचे रंग
वडीलांचे कौतुकाचे रंग
पत्नीचे गडद प्रेमाचे रंग
मित्रमैत्रिणींचे आपुलकीचे रंग
प्रेयसीचे प्रणयाचे रंग
परमेश्वरी कृपेचे रंग
निसर्गाच्या औदार्याचे रंग
लष्करी आणि नागरी जवानांचे संरक्षणाचे रंग
धर्माचे सुसंस्कृत करणारे रंग
शुभ स्वप्नांचे मधुर रंग
खाद्यपदार्थांच्या चवीचे रंग
संतांच्या निरपेक्ष शिकवणुकीचे रंग
बालकाच्या निर्व्याज दृष्टींतील गहिरे रंग
सौंदर्याचे थक्क करणारे रंग
या पैकी एक जरी रंग अनुभवला असेल त्याला इच्छा नसताना चेह-यावर चोपडले जाणा-या कृत्रिम रंगांचा तिटकाराच येईल.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"