🙏देव कधीच मोबदला मागत नाही🙏
ऐंशी वर्षाच्या एका जेष्ठ व्यक्तीच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया होते.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिल येते आठ लाख रुपये. त बिल पाहून त्या जेष्ठ व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. ते पाहून डाॅक्टर म्हणतात की, काळजी करु नका मी कमी करून देतो.
त्यावर ते जेष्ठ नागरिक म्हणतात, हे बिल खूप कमी आहे. दहा लाख रूपये आले असते, तरी ते भरायला मी समर्थ आहे.
डोळ्यात अश्रू आले आहेत कारण, ज्या परमेश्वराने माझे हे ह्रदय गेली ऐंशी वर्ष सांभाळले, त्याने कुठलेही बिल पाठवले नाही. तुम्ही केवळ तीन तास सांभाळले, तर आठ लाखांचे बिल पाठवले.
माझा परमेश्वर कुठलाही मोबदला न मागता माझी किती काळजी घेतो, या विचारांनी माझ्या डोळ्यात अश्रु उभे राहिले आहेत. त्या परमेश्वराचा मी शतश: ऋणी आहे.
🙏🌹🌹🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"