Sunday, March 17, 2019

कुलदैवत

अनेक कुंडल्या आणि समस्या पाहता बहुतांशी समस्येचे मूळ या संदर्भात काही समान सूत्र आढळली काही रूढी-परंपरा तसेच कुलाचार आणि दैनंदिन उपाय-उपासने द्वारे फारशा समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेता येते. नेहमी कुलदैवतांचा मान प्रथम असतो. काही कुटुंबात इष्टदैवत आणी गुरु परंपरेला अधिक महत्व असते आराधना कोणत्याही दैवताची आणि कोणत्याही परंपरेशी निगडीत असल्यास काहीच हरकत नाही पण आधी मान कुलदैवतांचा असतो. रोज स्नान केल्यावर श्री गणेशाचे स्मरण करून कुलदैवते आणि ग्राम दैवताचे स्मरण करावे नंतर आराध्य दैवताची उपासना करण्यास हरकत नाही. आपल्या कुलदैवतांचे एखादे स्तोत्र किंवा अष्टक उपलब्ध असल्यास ते आवर्जून नित्य पठन करावे. सर्वात महत्वाचे म्हणजे कुलदैवताना आपल्या घरात स्थान असणे अत्यावश्यक आहे. बर्यातच घरात त्यांचे फोटो-मूर्ती अथवा टाक नसतात आपल्या वास्तूत त्यांना स्थापन केले नाही तर आपल्याला तरी स्थैर्य कसे लाभावे? शक्य तो दर वर्षी कुलदैवतांचे दर्शन घेऊन त्यांचे मानपान करावेत तसेच परंपरेनुसार सर्व कुलाचार यथासांग पूर्ण करावेत हा नियम ग्रामदैवताच्या बाबतीतही पाळावा अगदी दर वर्षी भेट देणे शक्य नाही झाले तरी एका वर्षाआड तरी दर्शनास जावे. श्राद्ध कर्मे न चुकता पार पाडावीत. काही दोष कुंडलीत असू शकतात त्यामुळे अनैसर्गिक अडचणी सातत्याने येत राहरात आणि प्रगति खुंटते. शांतिविधी वैगेरे करणे जमत नसेल तर काही घरगुती उपाय आहेत त्यामुळे दोष निवारण होण्यास मदत मिळते तसेच तीव्रता कमी कमी होत जाते. सोमवार आणि पोर्णिमा अमावास्येला शंकराच्या मंदिरात पिंडीवर जलाभिषेक करून शंकराचा जप करत पिंडीजवळ श्रीफल ठेवून पिंडीवर एक मूठ तांदूळ वाहणे आणि प्रार्थना करणे सर्व दोष दूर करा आणि लक्ष्मीचे आगमन घरी होऊ दे. शनिवारी सकाळी पिंपळाला प्रदक्षिणा आणि जल देणे उदबत्ती लावणे 11 प्रदक्षिणा काढणे समोर गुळाचा खडा ठेवणे वृक्षाला स्पर्श करू नये. घरात रोज गोमूत्र शिंपडणे आणि धूप घालणे शिवाय लादी पुसताना पाण्यात खडेमीठ घालणे. दर अमावास्येला संध्याकाळी 7 ते 7.15 या वेळेत दहिभाताचा नेवेद्य घराबाहेर उंचावर ठेवणे. आपण सहज करू शकू असे उपाय-उपासना आहेत त्यामुळे अनुकूलता निर्माण होते आणि अनेक कामे मार्गी लागतात., कुलदैवतांची कृपा प्राप्त होते दैवी अधिष्ठान लाभले तर काय अशक्य आहे? मनापासून कुलदैवतांची आराधना करावी. एक सर्व मंगल करणारे all in one म्हणावे असे फार प्रभावी स्तोत्र आहे. शक्य असेल तर त्याचे रोज संध्याकाळी नित्य पठन करावे या स्तोत्राचे नाव आहे श्री मंगल चंडिका स्तोत्र. हे स्तोत्र वाचायची सुरवात मंगळवारी करावी. रोज संध्याकाळी तीन वेळा हे स्तोत्र वाचावे. मनापासून उपासना केल्यास निश्चितच प्रचिती येईल.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"