Monday, February 4, 2019

अन्नदान

🌿"अन्नदान"  🌿                       सध्या काही सुशिक्षित घराणे अशी आढळतात त्यांच्यातच अन्नदानाची पद्धती नाही याचे कारण काय तर त्यामुळे  काम खूप पडते व दुसरे म्हणजे महागाई हे जरी खरे असले तरी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे अन्नदान जरूर करावे जर तुमचा भाव श्रेष्ठ असेल तर ईश्वर तुमच्या पाठीशी असतो पांडवांच्या चरित्रातील गोष्ट सर्वश्रुत आहे एकदा भगवंत पांडवांच्या घरी आले व म्हणाले मला फार भूक लागली आहे त्यावेळी जेवणाची वेळ होऊन गेली होती सर्वा अन्न  संपलेले होते . परंतु घरात फक्त एक तुळशी पत्र होते भगवंताने अगदी सूक्ष्म रूप धारण केले होते तुळशीपत्र खाऊन तृप्त झाले तुम्ही अन्नदान करता तेव्हा  तुमच्या हातून घडले पाहिजे घरात अन्नदान केले गेले पाहिजे तरच त्याचे सार्थक होते आजकाल लोक हॉटेलमध्ये जेवू घालतात परंतु ते योग्य नाही घरात अन्नदान केल्याने आत्मिक समाधान मिळते शिवाय घरातील सर्वांच्या हातून ते घडत असते म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल  तेवहा 
 अन्नदान आवश्यक करा  अन्नदान केल्याने तुमच्या घरात अन्न पुरवठा राहतो अन्नाला चव   सुद्धा येते . आपण अन्नदान करीत असताना हे सर्व परमेश्वरच करीत आहेत आपण निमित्त मात्र आहे अशी भावना ठेवली पाहिजे मात्र याचा अर्थ असाही घ्यायचा नाहि कि रोज दहा लोकांना जेऊ घालावे त्यामागे एवढाच अर्थ अभिप्रेत आहे की सतत सत्कर्म करण्याची बुद्धी ठेवावी देण्याची बुद्धी ठेवावी काही लोक असे म्हणतात की,  त्यांच्या हातून काही सुटत नाहीत अन्न चांगले असताना देणार नाहि शिळे झाले की मग दुसऱ्यांना देतात अशी वृत्ती कधी नसावी प्राप्त परिस्थितीत आपल्याला जे जमेल ते दुसऱ्यांसाठी करण्याची भावना सतत मनात बाळगावी ईश्वर सदैव पाठीशी असतो.(प.पू.श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज नगर .)🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"