Tuesday, August 27, 2019

वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.

वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.
वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना
आपण पवित्र मानतोच. बहुतेक गावात एक पूर्ण
वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच.
उंबराचे झाडही आपण पवित्र मानतो.
नृसिंहानी हिरण्यकश्यपुचा वध केला तेंव्हा नृसिंह
अत्यंत क्रोधीत झाले होते, काहि केल्या त्यांच्या
शरीराचा दाह कमी होत नव्हता, उंबराच्या
फळामध्ये नखे रोवल्यानंतरच त्यांचा क्रोध हळू हळू
कमी होऊन नृसिंहस्वामी शांत झाले.
उंबराच्या फळामधील शांतरसाच्या गुणधर्मामुळेच
उंबरठ्याची संकल्पना आली. घरातील प्रत्येक
व्यक्तीने घरात प्रवेश करताना, उंबरठा ओलांडल्याने
त्याचे मन शांत व्हावे , घरात शांतता प्रस्थापित
व्हावी, सकारात्मक उर्जा प्रस्थापित व्हावी हि
खरी या मागील संकल्पना आहे.
उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी
पाण्याचा वाहता झरा असतो, असे आढळल्यामूळे,
नवीन विहिर खोदताना, हा निकष लावला जातो.
उंबराच्या झाडाखालून जाताना, एकतरी उंबर
खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नये, असा संकेत आहे.
गडकिल्ले भटकताना, कुठेही उंबराचे झाड दिसले, तर
आवर्जून उंबराची फळे खावीत. हे फळ खाल्यास
बराच वेळ तहान वा भूक लागत नाही.
उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही.
पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी
ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे.
सध्या उंबरठ्याच्या नावाखाली कोणत्याही
प्रकारचे लाकूड वापरण्यात येते. काहि जण लाकडा
ऐवजी फरशी बसवितात, हे काही योग्य नाही.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"