##.. रोजमेरि आँईल....🌹...
*
* निरामय आयुर्वेद*
अनेक इसेंशिअल आँईल आहेत. जे अरोमा पद्धत्तिने
वापरून शरिराच्या, मनाच्या अनेक व्याधि बरे करता येतात.. * रोजमेरी तेल* हे सुद्धा अतिशय उपयोगि तेल आहे. शरिरात रक्ताभिसरण निट होण्याकरता या तेलाचा वापर केला जातो. याच्या मालिश मुळे तो सुरळित चालतो. वेदना शामक असल्याने तीव्र डोकेदुखी असल्यास कपाळाला याचे काहि थेंब घेऊन चोळल्यास
आराम पडतो. तसेच शरिराच्या कोणत्याहि भागावर सूज आल्यास रोजमेरिचे तेल त्या प्रभावीत जागेवर लावल्यास सूज कमी होते.
##..नि. आयुर्वेद.
डिप्रेशन, मानसिक तणाव, चिंता, यावर..* रोजमेरी तेल*
चांगले काम करते. याचे काहि थेंब गरम पाण्यात टाकून याचि वाफ घ्यावि. कींवा, रूमालावर याचे थेंब घ्यावे.
मन प्रसन्न होऊन तजेला येतो, व मूड चांगला होतो.
* रोजमेरी हि* जंतूनाशक असल्याने कोमट पाण्यात याचे थेंब टाकून गुळण्या केल्यास हिरड्यांचि सूज, व दाताचे दुखणे कमी होते. तिथला संसर्ग दूर होतो.
कँविटि दातातली भरून येते जर रोजमेरिचा अर्क तिथे
लावला तर..
##.नि. आयुर्वेद.
स्नायु मोकळे होण्याकरता, स्नायूचि ताठरता, दूःख, दूर करण्यासाठी या तेलाने मालिश करावी, कारण हे वेदना दूर करते, पोटाला जर या तेलाने मालिश केलि, तर बद्धकोष्ठ, आतड्याचे आजार दूर होतात.
पावसाळ्यात छातिचे, विकार होतात, सर्दि, खोकला, पडसे, दमा , हे बळावतात. तेव्हा गरम पाण्यात
याचे थेंब टाकुन वाफारा घेतल्यास हे सर्व आजार दूर होतात. बंद नाक मोकळे होते.
## नि. आयुर्वेद.
तोंडाला येणारि दुर्गंधि, या तेलाच्या पाण्यात टाकून गुळण्या केल्यास दूर होते. खाज, खरुज, घामोळे, व अनेक प्रकारच्या चर्मरोगिवर ..* रोजमेरि तेल*
चांगले काम करते. त्वचेवर लावल्यास जंतूनाशक असल्याने तो रोग बरा होतो. केसांच्या उत्तम वाढिकरता व केसाचे आरोग्य चांगले राहण्याकरता * रोजमेरी तेल*
अन्य तेलात मिसळून लावावे. केसगळति, कोंडा होणे हे सर्व त्रास बंद होतात.
## नि. आयुर्वेद.
रोजमेरि वनस्पति अनेक खाद्यपदार्थात देखिल वापरतात, ज्याने पदार्थाला सुंदर चव येते
आणि पौष्टिकता पण वाढते. आणि यात विटामिन बी, व विटामिन ए. भरपूर प्रमाणात आहे त्यामूळे
याच्या पानांचा वापर बर्याच रेसिपित वापरल्या जातो
... अनेक सौंदर्य प्रसाधनात याचा वापर होतो
आपण फेशिअलमध्ये याचे काहि थेंब टाकल्यास
चेहरा मुलायम, दागरहित होतो.,
तेव्हा आपणहि हे उपयुक्त तेल वापरून, अनेक रोग
बरे करू शकतो...
..... 🌹# 🌹 # 🌹......
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"