Thursday, August 22, 2019

मोरपीस

----------------
   मोरपीस
------------------

मोरपीस खूपच शुभ मानले जाते.

कारण भगवान श्रीकृष्णांनी ते आपल्या मस्तकावर धारण केले आहे.

मोरपीसाचा संबंध केवळ श्रीकृष्णाशी नसून इतर देवी-देवतांशीसुद्धा आहे. 
शास्त्रानुसार मोरपिसामध्ये सर्व देवी-देवता आणि सर्व नऊ ग्रहांचा वास आहे.
प्राचीन काळी एक मोराच्या माध्यमातून देवतांनी संध्या नावाच्या आसुराचा वध केला होता. पक्षी शास्त्रामध्ये मोर आणि गरुड पक्षाच्या पिसाचे (पंखाचे) विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे
आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होई ना घरात मोरपीस ठेवतात. 

मोरपीस आकर्षक तर दिसतेच, 

मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते, एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते....
 
------------------------------------------------
  मोरपीस योग्य दिशेला कसे  ठेवावे
-----------------------------------------------

१. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 

२.  एखाद्या मंदिरातील राधा कृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस ४० दिवसांसाठी लावावे. त्या मूर्तीला तुप-साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि ४१व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे. 

३. काल सर्प दोष दूर करण्यासाचीही अपार शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते. ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत सात मोरपीसे टाकावीत.
 दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी ११ पिसे असणारा पंखा लावावा. 

४. मस्तीखोर मुलाला शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल. 

५. नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपिस ठेवा. यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते.

-----------------------------------
मोरपिसाचे इतर काही फायदे
-----------------------------------

१. वैवाहिक जीवनात शांती आणि प्रेम कायम ठेवण्यासाठी आपल्या बेडरूमच्या पूर्व-दक्षिण दिशेला मोरपंख लावावा. यामुळे प्रेम कायम राहील आणि अपूर्ण काम पूर्ण होण्याचे योग जुळून येऊ शकतात.

२. घर किंवा दुकानाच्या दक्षिण-पूर्व दिशेला मोरपंख ठेवल्याने वास्तूचे विविध दोष नष्ट होतात. नकारात्मकता दूर होऊन धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.

३. घराच्या मेनगेटवर तीन मोरपंख लावावेत. या मोरपंखांखाली श्रीगणेशाचा छोटा फोटो किंवा मूर्ती लावल्यास घरातील सर्व वास्तुदोष दूर होऊ शकतात.

४. जो व्यक्ती नेहमी स्वतःजवळ मोरपंख ठेवतो, त्याला प्रत्येक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होऊ शकते. यासोबतच स्वतःच्या डायरीमध्ये मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे शिक्षणाशी संबंधित कामामध्ये यश प्राप्तीचे योग जुळून येतात.

५. कोणत्याही शुभ दिवशी मोरपंख घरी आणून एखाद्या अशा ठिकाणी ठेवावा, जेथे येणाऱ्या-जाणाऱ्यांची दृष्टी त्यावर पडेल. यामुळे तुमच्या घराला कोणाचीही दृष्ट लागणार नाही." -

भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केल्यास मोरमुकुटधारी श्रीकृष्ण डोळ्यांसमोर येतो. साक्षात श्रीहरीचा अलंकार बनून त्याच्या मस्तकी विराजमान होण्यासाठी त्या मोरपिसाने किती बरे भक्ती केली असेल ! आपण सर्वांनी आपल्या डोळ्यांसमोर ते मोरपीस आठवूया. विविध रंगी छटा असलेले मोरपीस आपल्याला भक्तीचा कोणता संदेश देत आहे ?, हे आपण समजून घेऊया.
१.  श्रीकृष्णाच्या मुकुटात विराजमान असलेल्या मोरपिसाला अनुभवणे
अ. श्रीकृष्णाच्या मुकुटातील सुंदरसे मोरपीस आपल्या डोळ्यांसमोर आहे. श्रीकृष्णाच्या मुकुटात ते किती आनंदाने डोलत आहे, हे अनुभवतांना आपली भावजागृती होत आहे.
आ. श्रीकृष्णस्पर्शाने पावन झालेल्या या मोरपिसाचा चैतन्यमय स्पर्श आपण अनुभवूया. मोरपिसाचा हलकासा स्पर्श म्हणजे श्रीकृष्णाचा कोमल स्पर्श आहे, असे आपल्याला जाणवत आहे. आपण सर्वांनी मोरपीसरूपी श्रीकृष्णस्पर्शाची अनुभूती घेऊया.
इ. या चैतन्यमय आणि हलक्या स्पर्शाने आपल्यावरील रज-तमाचे आवरण नष्ट होऊन आपल्यावर आध्यात्मिक उपाय होत आहेत, तसेच आपल्या अंतरातील भावाचे केंद्र जागृत होत आहे.
हलकेपणा, सुंदरता, पवित्रता, सहजता आणि निर्मळता या सर्व गुणांनी परिपूर्ण असल्यामुळेच मोरपिसाला सदैव श्रीकृष्णाच्या मुकुटावर स्थान प्राप्त झाले. मोरपिसाच्या या निर्मळ भक्तीला आपण कोटी कोटी प्रणाम करूया आणि भगवंताने आज आपल्याला मोरपिसाच्या भक्तीचे रहस्य सांगितले, यासाठी त्याच्या चरणीही कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया !
 २. मोरपिसाने दिलेला भक्तीचा संदेश !
अ. मोरपीस सर्वसमावेशक आहे. त्याने आपल्यामध्ये सर्व रंगांना सामावून घेतले आहे. त्याच्या माध्यमातून श्रीकृष्ण आपल्या सर्व भक्तांना हाच संदेश देत आहे की, आपल्यालाही सर्वकाही सामावून घ्यायचे आहे आणि आपले जीवन हे विविध गुणरंगांनी नटवायचे आणि फुलवायचे आहे.
आ. वारा ज्या दिशेने वहातो, त्याच दिशेने मोरपीसही हलत असते, म्हणजे समोरच्या परिस्थितीनुसार ते स्वतःत पालट करत असते. त्याप्रमाणे आपल्या समोर येणारी प्रत्येक परिस्थिती ही आपल्यामध्ये पालट घडवण्यासाठी निर्माण झालेली असते, हे लक्षात घेऊन आपण ती परिस्थिती मनापासून स्वीकारून मोरपिसाप्रमाणे सतत आनंदी राहून निर्मळ भक्ती करूया.
इ. आध्यात्मिक उपाय करतांना श्रीकृष्णाचे ते मोरपीस आपल्या देहावरून फिरत आहे आणि आपल्यावर उपाय करत आहे, असा भाव ठेवूया. आपल्याला जेव्हा उत्साह वाटत नसेल, तेव्हा त्या मोरपीसरूपातील श्रीकृष्णस्पर्श अनुभवून पुन्हा उत्साही होण्याचा प्रयत्न करूया.


No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"