Tuesday, August 27, 2019

हिंदुधर्मामध्ये स्नान केल्याबरोबर कपाळी गंधा विषयी माहिती

हिंदुधर्मामध्ये स्नान केल्याबरोबर कपाळी गंधा विषयी माहिती 

आम्हा अलंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहू कंठी ॥
गोपीचंदन मुद्रा धारणे । आम्हा लेणे वैष्णवा ॥
शरीराच्या प्रत्येक अवयवावर देवतांचे किंवा भगवंताचेच अधिष्ठान आहे. पुराणांतरी कोणत्या अवयवाच्या ठिकाणी नामस्मरण करून गंध लावावे, हे सांगितले आहे. -

ललाटे केशवं विद्यात्कंठे श्रीपुरुषोत्तमम् ।
नाभी नारायणं देवं वैकुठं हृदये तथा|
दामोदरं वाम पार्श्वे दक्षिणे च त्रिविक्रमम् ।
मूर्ध्नि चैव हृषीकेशं पद्मनाभं च पृष्ठत: ।
कर्णयोर्यमुना गंगे बाव्हो कृष्णं हरिं तथा ।
यथा स्थानेषु तुष्यन्ति देवता द्वादशा: स्मृता: ।
द्वादशौतानि नामानि कर्तव्ये तिलके पठेत् ।
सर्वपापनिशुद्धात्मा विष्णुलोकं स गच्छति ।

अर्थ  - कपाळाच्या जागेवर केशव, कंठाच्या ठिकाणी पुरुषोत्तम, नाभीच्या ठिकाणी नारायण, हृदयाच्या ठिकाणी वैकुंठ, डाव्या हाताच्या मुळाशी दामोदर, उजव्या हाताच्या मुळाशी त्रिविक्रम, मस्तकावर हृषिकेश, पाठीच्या ठिकाणी पद्मनाभ, उभय कानांच्या ठिकाणी यमुना व गंगा, उभय बाहुस्थळी कृष्ण - हरी, असा क्रम श्रुतिकारांनी सांगितला आहेअ. गंध लावताना त्या त्या नावाचा जप करावा, म्हणजे निष्पाप होऊन विष्णुलोकी वास्तव्य घडते. फ़ल - हिंदुधर्मातील चारी वर्णीयांनी गंध लावले असता व गोपीचंदनाने शरीर युक्त असा तो ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्त होतो.
कलियुगात गोपीचंदनाचा टिळा धारण करणारा पुरुष श्रेष्ठ होय. तो चुकूनही दुर्गतीला जात नाही. गोपीचंदन म्हणजे पुष्करतीर्थातील मृत्तिका होय. ही पवित्र असल्याने देहाला पवित्र करणारी आहे. ज्याच्या घरात गोपीचंदन आहे, त्याच्या घरात श्रीविठ्ठलाचे वास्तव्य खात्रीने असते.

ज्याच्या कपाळी गंध नसेल त्याचे सुतकी तोंड पाहू नये. चुकून दृष्टीस पडल्यास सूर्यदर्शन अवश्य करावे. त्यामुळे पाप नाहीसे होते.

देवास गंध कसे लावावे ?

देवतांना विशेषत: ' गंधाष्टक ' वाहतात. सर्वसाधारण लोक केवळ चंदनच वाहतात. १ चंदन, २ केशर, ३ वाळस, ४ कापूर, ५ धूप, ६ र्‍हीबेर, ७ कोष्ट, ८ जटामांसी ही द्रव्ये एकत्र उगाळून ' गंधाष्टक ' तयार होते. सर्व देवांना लागू असे गंध म्हणजे सुगंधी द्रव्य, चंदन, धूप, कृष्णागारू धूप व केशर हे क्रमाने एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. विष्णूला तुळशीकाष्ठाचे गंध विशेष प्रिय आहे. तुळशीच्या पानाला गंध लावून ते विष्णूला वाहिले असता त्याला अत्यंत प्रिय आहे. गंध शिंपल्यात ठेवावे. हातावर किंवा तांब्याच्या पात्रात ते कधीही ठेवू नये. देवाला पातळ गंध न वाहता त्याच्या गोळ्या करून वाहाव्यात.

आपली संस्कृती.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"