Friday, August 16, 2019

*दत्त भिक्षेचे महत्व*

*दत्त भिक्षेचे महत्व* 

श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरूचरित्राचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे. श्री गुरू चरित्राच्या पाचव्या अध्यायात माधांन्य समयी भिक्षेसाठी येणार्या अतिथी बाबत आस्था असणे गरजेचे आहे, त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्त गुरूयेऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे. माधान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर ईथे दत्तप्रभूंना भिक्षा दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर ईथे मा जगदंबे कडून भिक्षा ग्रहण करतात. गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायात पीठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सूमती यांच्या कडे श्राध्द होते, अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राध्दीय ब्राम्हण जेवले नसतांना माता सूमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली त्या अतिथीदेवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला कालातंराने सूमती मातेस गणेश चतूर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभा च्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे. या शिवाय श्री गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लिला दाखवल्या, ती स्थळे पाहणे त्यास्थळांना भेटी देणे दर्शन घेणे तिथे अनूष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो तिर्थाटनाचा हा त्यामागिल एक ऊद्देश असतो.
पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥
तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥
ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥
वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥
न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥
त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥
दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६।।
माधान्ह समयी अतिथीकाळी । दत्तात्रेययेताति तये वेळी ।
विमूख न व्हावे तये काळी । भिक्षामात्र घालिजे ।३४।।
।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।
श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते

१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. 
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. 

श्री गुरु दीपावली व भक्तांसाठी आठ रूपे

आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
श्रीगुरू गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरुंचे सात शिष्य श्रीगुरुंच्याकडे आले. या मंगल दिनी श्रीगुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरुंना विनंती केली. श्रीगुरुंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार ? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा." श्रीगुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरु झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरुंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, "मी तुझ्याकडेच येईन; पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा." अशारीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्रीगुरू फक्त आपल्याच घरी येणार नाही म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सार्वजण आपापल्या गावी गेले.
दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली, तेव्हा ते श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार ? मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे ? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये." त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, "तुम्ही चिंता करू नका. आम्ही येथेच राहू." ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी मंगलस्नान केले. आपल्या योग-सामर्थ्याने सात रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरुंचे ते सातही शिष्य गाणगापुरला मठात आले. त्यावेळी प्रत्येकजण सांगू लागला,"दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते." आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरुंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, "श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते, ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली."
हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. ते म्हणाले, "परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार ?" त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली.
ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंचे माहात्म्य हे असे आहे." या प्रसंगाने श्रीगुरूनृसिंहसरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकर सरस्वती गंगाधर सांगतात, "सज्जन हो ! तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्रीगुरुसेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्रीगुरुंचे नामामृत प्राशन करतात. श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरुन जाण्यास श्रीगुरू हाच एक आधार आहे.

गुरुचरित्र अन्वयार्थ

प्रत्येक अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे की,
"अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील." 
गुरुचरित्राच पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे ? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आणि अशाश्वत आहे. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्रीगुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित. आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु / परमात्मा एकच होऊन जाल. पण तत्पूर्वी आपणच लावलेली पापाची बीजं भोगुन संपवावी लागतात. सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र भोगूनच संपवावे लागते. पूर्वकर्माची निष्कृती झाली की मग "मी तू पणाची झाली बोळवण" अशी अवस्था येते. तुमच्यात आणि सद्गुरुत वेगळेपणा उरतच नाही. तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता. 

श्री गुरुदेव दत्ताच्या चरणी लीन

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"