Thursday, August 22, 2019

भक्ती म्हणजे काय...?

"  भक्ती  " 
    भक्ती म्हणजे काय...? 

किती साधी सोपी सरळ
  व्याख्या आहे पहा....💐

भक्ती जेंव्हा " अन्नात " शिरते ..
तेंव्हा तीला " प्रसाद "  म्हणतात..
आणि भक्ती जेंव्हा "  भुकेत " शिरते तेंव्हा तीला "  उपवास "  असे म्हणतात.
भक्ती जेंव्हा पाण्यात शिरते तेंव्हा तीला " तीर्थ "  संबोधतात आणि 
भक्ती जेंव्हा "  प्रवासाला "  निघते 
तेंव्हा तीला "  यात्रा " असे म्हणतात.
भक्ती जर का " संगीतात " शिरली तर आपण तिला  " भजन / कीर्तन "  असे म्हणतो...
आणि हीच भक्ती जर का  " लोकसंगीतात " शिरली तर त्याला "भारूड " म्हणतात..
भक्ती जेंव्हा " माणसात " प्रकटते तेंव्हा " माणूसकी " निर्माण होते 
आणि हीच भक्ती जर " घरात " शिरली तर त्या घराच " मंदिर " होत.
भक्ती जर का  शांतपणे " मनाच्या गाभाऱ्यात " शिरली तर त्याला "  ध्यान " असे म्हणतात आणि भक्ती जर का "  कृतीत " उतरली तर तिला " सेवा " असे म्हणतात...
       🙏🏻💐🙏🏻

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"