डिटाँक्सीफिकेशन आँफ बाँडी.
आज सकाळी एक प्रश्न आला बाँडी डिटाँक्स करण्या संदर्भात या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या आयुर्वेदात या विषयावर छान माहिती आहे. किंबहुना शरीर दोष विरहित रहावं ते वेळच्या वेळेवर डिटाँक्स होत जाऊन शरीर निरोगी राहवं म्हणून त्रिफळाच्या रुपाने मनुष्याला शरिराचं डिटाँक्सी फिकेशन करुन निरोगी राहण्याचे एक वरदान दिलं आहे.पण मनुष्य देह या आलेल्या संधी आणि वरदानांना नेहमीच नाकारत आला आहे.खरंतर वेळच्या वेळी याच सेवन केलं तर शरिरातील त्रिदोषां वर नियंत्रण मनुष्य करु शकतो व वाढलेल्या दोषाचं निर्मुलन करून बाँडी डिटाँक्स करु शकतो व तो दोष दुर करु शकतो.खरतरं बाँडी डिटाँक्स करण्याचं त्रिफळा चुर्ण बेस्ट साधन आहे.
त्रिफळाचुर्णाने होणारे फायदे.
माणसाला वात,पित्त, कफ याचे संतुलन बिघडले की ९०टक्के आजार होतात.त्रिफळा चुर्ण ही एक अशी गोष्ट आहे या सर्वांना नियंत्रणात ठेवते.आणि हे त्रिदोष एकदा नियंत्रित राहीले की माणूस कुठल्याही आजारांना बळीच पडत नाही. आपल्या निसर्गाने व आयुर्वेदानं दिलेली ही मोठी देणगी आहे. रोज रात्री गरमपाण्यात घेतल्यास तो रेचक बनून शरीरातील दोष कमी करतो.व सकाळी दूधात घेतल्यास तो पुरक होऊन शरीरात बल,पुष्टी, उर्जा प्रदान करून आयुष्य निरोगी ठेवण्यास मदत करत असतो.तरीही काही दोष हे शरीरात राहतात म्हणून संपूर्ण बाँडी डिटाँक्स करण्यासाठी आयुर्वेदात एक काल मर्यादा निश्चित केली असून संपूर्ण शरीर शुध्दी कशी कधी करावी या संबंधित भाष्य करताना महर्षी वागभट्ट आपल्या आष्टांगह्रदयम या ग्रंथातील चौथ्या अध्यायातील ३५वा श्लोका तून हे सुत्र मांडलय ते पाहूया म्हणजे आपल्याला हा प्रश्न समजणं सोपे आणि सुलभ होईल.
शीतोदभवं दोषचयं वसंन्ते विशोधयन् ग्रीष्मजम अभ्रकाले।
धनात्यये वार्षिकमाशु सम्यक प्राप्नोति रोगानृतुजान्न जातु।।
यात महर्षी म्हणतात जर तुमच्या शरीरात ऋतू नुसार दोष येऊ नये वाटत असेल तर संपुर्ण बाँडी प्रत्येक ऋतूच्या नंतर एकदा दोषरहीत करून घ्यावी म्हणजे शरीर शुध्दी होऊ शकेल. या श्लोकाचा आपण आता अर्थ समजून घेऊया म्हणजे मुद्दा अधिक स्पष्टपणे समजेल
ते म्हणतात हेमंत आणि शिशिर ऋतूत जेव्हा वातावरण थंड असते.तेव्हा शरीरात जमा झालेले दोष काढण्यासाठी योग्य वातावरण वसंत ऋतू योग्य आहे. तेव्हा शरीरात साचलेला मल,कफ व इतर दोष काढून टाकावेत नाहीतर ऋतू नुसार होणार्या आजाराचे तुम्ही शिकार व्हाल.यासाठी ते म्हणतात थंडीत साचलेले दोष वसंत ऋतूत शरीरातून काढून टाका. नाहीतरते गर्मीच्या उन्हाळ्याच्या वातावरणात तुम्हाला नाकात साचून सायनस, अँलर्जी,शितपित्त होऊन,अथवा रँशेस बनून अथवा त्वचा रोग बनून उन्हाळ्यात तुमच्या समोर उभा ठाकतील.तसेच गर्मी अथवा उन्हाळ्यात साचलेले शरीरातील रोग वर्षा ऋतूच्या प्रारंभी शरीरातून काढून टाकावेत.व पावसाळ्यात साचलेले दोष शरद ऋतूत शरीरातून बाहेर काढून मोकळे व्हा .आता हे दोष अथवा टाँक्सीन काढण्यासाठी ते पुढील श्लोकात पंचकर्मातील वमन ,व विरेचन,व बस्ती करण्याचा सल्ला देतात.अशा प्रकारे तुम्ही तुमचे शरीर निरोगी ठेऊन शरीरातील टाँक्सीन बाहेर काढून निरामय जीवन जगू शकता असे महर्षी म्हणतात. पण आपण आधी मी म्हंटल्या प्रमाणे .रोज त्रिफळा चुर्ण व पंधरा दिवसातून एकदा वमन केलंत तर कधीच व्याधी जवळपास ही फिरकणार नाहीत. व बाँडी डिटाँक्स होईल.
वैद्य गजानन.
७७१५९९४०६०
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"