"कोरफड "
कोरफड ही सगळ्यांच्या परिचयाची अशी आहे, बरेच जण थोड्या प्रमाणात त्याची लागवडही करतात. वेगवेगळे मेसेज हे सोशल मीडियातून लोकापर्यंत पोहोचत असतात, असे मेसेज वाचून काहीजण स्वतःवर प्रयोग देखील करतात, "दररोज दोन तुमचे कोरफड रस प्या, तुमचे शरीर निरोगी राहील" असे मेसेज वाचून लोक त से चालू करतात, वास्तविकता ते खूप चुकीचे आहे. कोरफड बाबतीत एक चांगला मेसेज सगळीकडे जावा, त्याची शास्त्रीय माहितीही लोकांना व्हावी, असा आग्रह आमच्या एक जवळच्या वैद्य मित्रानी केला, म्हणून आजचा कोरफड चा लेख लिहीत आहे, तो सर्वांच्या उपयोगी पडेल याची मला खात्री आहे. कुमारीचे बरेचसें पाळीचे आजार याने बरे होतात म्हणून यास" कुमारी" असेही म्हणतात, दक्षिणेकडे हे खूप प्रमाणात येते, कदाचित "कन्याकुमारी "हे नाव त्यामुळे ही पडले असावे, कोरफडीच्या पानावर प्रक्रिया करून "काळा बोळ "तयार करतात तो खूप औषधे आहे, कोरफड कुठेही येते, तिला जास्त पाणी चालत नाही, कडक ऊन असेल तर ती सुकते, मात्र हवेतील ओलावा शोषून ती जगते. भारताच्या काही भागात, तर कोरफडीपासून लोणचे व लाडूही तयार करतात. कोरफडीचा छान वापरऔषधम्हणून करून घेता येतो, आम्हाला तर खुप छान असे अनुभव आले आहेत.
1) बाह्य उपचार:-
शरीरावर कुठेही सूज, ठणका असल्यास कोरफडीच्या ग रात हळद टाकून, ती गरम करून ती त्या जागेवर बांधावी. शरीरावर कुठेही भाजल्यास त्या ठिकाणी गर लावावा, लगेच गार वाटते. मुळव्याध मध्ये, आग ठणका सुज या ठिकाणी असते. तिथेही गर लावावा, सूज कमी होईल. काळाबोळ चा, आम्ही छान वापर करून घेतो. ज्या मुलांना लघवी, संडास होत नाही, त्यांना काळाबोळ, बेंबीखाली उगाळून लावायला सांगतो. थोड्याच वेळामध्ये, लघवी व पोट चांगल्या पद्धतीने साफ होते. चालताना, पळताना लहान मूल किंवा वृद्ध व्यक्ती ही पडतात, मग त्या ठिकाणी ठे चाळून, सूज येऊन रक्ताची गाठ होते, आंबेहळद उगाळून काहीजण लावतात, तसेच काळा बोळ लावल्यास चांगला आराम पडतो, डोळे आल्यावर गर फडक्यात गुंडाळून ते डोळ्यावर फिरवावे, एका आजीबाईंनी हा उपाय आम्हाला सांगितला, दोन-चार रुग्णावर त्याचा प्रयोगही करून बघितला, चांगला आराम पडलेला दिसून आला. केसांच्या विकारावर कोरफड रस तेलात टाकून ती डोक्याला लावायला आम्ही सांगतो.
2)रक्त शुद्धी :-
लोक हे खाण्यापिण्यातील दोषामुळे" रक्तधातू" बिघडवतात, मग बरीच लक्षणेही जाणवतात, कारखानदारीमुळे बरीच, उत्तरेकडील लोक हे आमच्या भागात कामास आहेत, रात्र पाळ्या, अंडी, बटाटा, लोणचं, तिखट, वडापाव, फरसाण, शीतपेय, त्यांच्या आहारात याचा जास्त भरणा असतो, त्यांना मग रक्तात दोष होऊन, बरेच विकार होतात, जसे अंगात पुळ्या येणे, खाज सुटणे, छोटे मोठे फोड येणे, अंगावर बारीक खरका येणे, त्यांना मग रक्तदुष्टी घालवण्यासाठी काdha योजना करावे लागते, त्यात कोरफड, हळद, मंजिष्ठा, पटोल ध माशा, गुळवेल अशा बऱ्याच औषधांचा वापर करावा लागतो काही दिवस प्रयोग केल्यास, बऱ्याच जनावर छान आराम हा पडलेला दिसून येतो.
3)खोकला -दमा :-
लहान मुलांच्या खोकल्यावर, हे खूप छान पद्धतीने चालते, लहान मुलांच्या वयोमानाप्रमाणे एक कणभर मीठ टाकून तो दिल्यास पोट साफ होऊन, खोकलाही कमी होते. दम्यावर ही खूप छान काम करते, एका शेतकऱ्याने कोरफडची लागवडही केली होती त्याच्या मोठ्या मुलीस, नुकतीच दम्याची सुरुवात झाली होती, तिला लगेच कोरफडीचा गर हा मध, तुपातून घ्यायला सांगितला. व बाकीचे औषधेही दिली, तिचा बराचसा दम कमी झाला, असे प्रयोग करायचे झाल्यास, जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने करावे.
4)पोटाचे विकार :-
बऱ्याच जणांना भूक लागत नाही तोंडात कशी चव येतच नसते, जेवणानंतर दोन तीन तासांनी पोट दुखते, बऱ्याच जणांना पित्ताचे खडे असतात, मग भरपूर प्रमाणात पोट दुखते, यकृताचे काम बिघडले की, काही जणांना कोरडा खोकला येतो. केवळ खोकल्याचे औषध देऊन, एक रुपया फायदा होत नाही. मग अशांना कोरफड, कुमारी आ स व दिल्यास छान आराम पडतो, मुळव्याधाचा रुग्णांनाही मी कुमारी असव देतो पोटातील आम नावाचे विष हे कमी होऊन, पोटही चांगले साफ राहते, मोड नरम पडतात.
5)पाळी चे विकार :-
प्रत्येक आई वडीलाचे हे एक काम असते, मुलीची पाळी नीट येते की नाही, तिच्या अंगावरून जाते की नाही, विशेष ता, आईने त्याकडे जास्त लक्ष द्यावे. पाळीचे विकार हे पुढे मुले बाळे व्हायला अडचणीचे ठरतात, हे मनात आणून, मुलीच्या लग्नाअगोदरच मुलींचा पाळी चा प्रॉब्लेम दूर करून घ्यावा, आजकाल pcod सारखे बरेचसे आजार मुलींना होत आहेत. माझ्याकडे अशा केसेस येतात, त्यातील एका मुलीला, सोळा वर्षे चालू झाले तरी पाळी आली नव्हती, मग तिला कुमार्यासव, बाकीचे औषधे पथ्य, पाणी बस्ती चे उपचार केल्याचे, या लेखाच्या निमित्ताने आठवले. तीन महिन्यांच्या उपचारांनंतर तिला पहिल्यांदा पाळी चालू झाली. आई-वडिलांचे टेन्शन दूर झाले.
6)खबरदारी :-
आयुर्वेदिक औषधांचा, साईड इफेक्ट होत नाही, त्याचा काही त्रास होत नाही, असा भला मोठा गैरसमज हा सर्वत्र पसरलेला आहे "दररोज कोरफड ग र दोन चमचे प्या "असे सांगणाऱ्यांना, शास्त्रीय ज्ञान हे किती असते? आयुर्वेदिक औषधेही तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावी त, कोरफड किंवा कुमार्यासव हे सतत कधीही देऊ नये, ते पुष्कळ प्रमाणात ही देऊ नये, ते जर दिले तर रक्ती मूळव्याध होऊ शकते, शौचाच्या ठिकाणी रक्तवाहिन्यांत दोष निर्माण होऊन रक्त हे पडते, तुमच्या किडनीला ही त्रास होऊ शकतो, कोरफडीचा वापर हा जास्त दिवस हा कधीच करू नये,
कोरफड र साची भावना देऊन, आमच्याकडे बऱ्याच गोळ्या तयार होतात, वयात आलेल्या मुलींच्या विकारावर ते हे एक नंबरचे औषध आहे, कोरफडीपासून तयार केलेल्या काळा बो ळाचा वापर आम्ही रुग्णात करून घेतो, एका रुग्णाची पाठदुखी ही कशाने जात नव्हती, बऱ्याच जणांकडून ती केस आमच्याकडे आली होती, चर्चेनंतर, आम् विषापासून निर्माण झालेली पाठ दुखी हे नेमके निदान करून, त्यांना कुमारी असं व, व काही औषधे दिले, थोड्याच दिवसात, दोन वर्षाची पाठदुखी ही कुठल्या कुठे पळून गेली.
राम -कृष्ण -हरी,
आपला,
डॉ :- विलास जगन्नाथ शिंदे,
जिजा ई आयुर्वेद चिकित्सालय,
खालापूर, रायगड.
फोन :-7758806466
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"