Tuesday, August 27, 2019

अजपा जप

अजपा हा श्रेष्ठ भक्तीचा प्रकार आहे. जिथे जीवाची चेतना आणि अचेतनाही बाधत नाही. जसे धनुर्धर अर्जून झोपेत असतानाही रोमारोमातून हरे कृष्ण ऐकायला येत असे. महान संत जनाबाई मुखाने शेजारनीशी भांडतानाही श्वास विठ्ठल विठ्ठल गायचे आणि संत चोखोबांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल गजर झाला. अर्थात अजपा भक्तीला ना जिभेची गरज ना श्वासाची.. जड-जीवात, चराचरात तो आणि तोच परमात्मा आहे ही जाणीव आणि अहं ब्रम्हास्मि ही भावना पुरेशी आहे.
वारंवार मुखाने जप जरी करत असाल तरी मी प्रत्येक क्षणी सर्वस्वी फक्त तुझाच आहे, मी तुझाच अंश आहे मी मलाच तुझ्या चरणी वाहत आहे ही भावना असेल तर आपल्याकडून कसा जप करुन घ्यायचा ती जबाबदारीही त्याची असणारच आहे.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"