देह भाड्याचे रे घर
"मी"ची उगा चरचर
जावे सद्गुरूसमोर
ठेवी पायांवर शीर
म्हणे माझा मी मालक
अरे गुरु देहाचा चालक
काही येईना डोक्यात
जागी वासनेची भूक
घेतो जमीन जुमला
गाडी, बांधीन इमला
पण कळेना अभंग
इथे मालक पांडुरंग
तुझ्या श्वासाचा व्यापार
त्याचा नित्य व्यवहार
सारे कर्म गुरु धुई....
तुला देणे घेणे नाही????
त्याचा व्यापार थांबला
तुझा श्वास रे संपला
काय घेउनी जाशील
भोग प्राक्तनाचे फळ
घाल सद्गुरुंना साद
मिळे तात्काळ प्रतिसाद
आज सद्गुरूंची "आण"
देहावरी तुळशीपान
सद्गुरू चरणी अर्पण...🍁🌹🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"