Wednesday, August 28, 2019

कल्याणमस्तू

आपली अडचण...हे करून तर पहा. सोप्या टिप्स ....कल्याणमस्तू

१. घराच्या मुख्य (सिंह) दरवाजापेक्षा घराचे आतील (उप) दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.
२. घराची पुनर्बांधणी (Re-Construction) करतांना जुन्या घराचे लाकूड, विटा, माती तत्सम साहित्य नवीन घरासाठी वापरू नये ते घरासाठी कलहकारक ठरते.
३. कोणत्याही आजारी माणसाने अथवा आजारी माणसास उत्तरेस/पूर्वेस तोंड करुन/बसवून औषध दिल्यास त्याचा आजार लवकर बरा होतो. (सार्थचरक संहितेमध्ये या संबधीचा उल्लेख आढळतो)
४. घरात लावलेली काटेरी रोपटी अथवा कॅक्ट्स Negative Energy अथवा उद्विग्नता तयार करतात, यामुळे अशी झाडे घरात असू नये
५. जास्तीत जास्त अन्नदान करावे त्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
६. आठवड्यातून एकदा मुख्य दरवाजा आतून बाहेरून खडे मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा.
७. लहान मुलांकडून काही नित्य स्तोत्रे रोज म्हणून घ्यावीत (मारुती स्तोत्र, शुभं करोति) व आपणही म्हणावीत. यामुळे घरात संस्कार वाढतात व चांगली पिढी घडण्यास उपयोग होतो.
८. काही लोक भंगलेल्या/तुटलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात ते चुकीचे आहे, त्यांना वाहत्या पाण्यात विसर्जित करावे.
९. मुख्य दरवाज्यास लाकडाचा उंबरठा असणे आवश्यक असते.
१०. "ज्याचे मन किंवा विचार मोठे त्याचे भाग्यही मोठे" असे श्री व्यासांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे व तेच आजचे मानासशास्रही सांगते, म्हणून नेहमी संकुचित विचार न करता मोठे, उदार विचार करावे, त्याने आपले भाग्यही मोठे होते.

११. घरात नंदादीप (म्हणजेच मोठा दिवा नाही, छोटाही चालतो) सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाहीत. (तिळीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा असावा, कापूरदिवा असल्यास effective आहे).
१२. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत.
१३. आपल्या घरामध्ये आपली पती/पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत. कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते.
१४. उत्तर दिशेत fishtank (मत्सालय) ठेवावे, व माशांची काळजी घ्यावी.
१५. घराचा मुख्य दरवाजा तुटलेला, कुजलेला, भंगलेला नको, त्यावर तोरण, स्वस्तिक असे मंगलयमय चिन्ह असावे.
१६. रोज घर पुसताना त्यात थोडे खडे मीठ व गोमूत्र घाला आणि घरातील सर्व कोपरे पुसून घ्या, याने घरातील मरगळ जाऊन आर्थिक वृद्धीही होते (हा अनुभव सिद्ध आणि effective उपाय आह, आपणही अनुभव घ्यावा).
१७. हवेने हलणाऱ्या छोट्या घंट्या वायव्य दिशेत लावाव्यात.
१८. श्री गणेश हि बुद्धीची आराध्य देवता, गणेश रुद्राक्ष धारण केल्याने अभ्यासात फायदा होऊन स्मरणशक्ती वाढते. छोट्या मुलांसाठी उपयोगी.(याचबरोबर रोज ओम गं गणपतये नमः या मंत्राचा पाच मिनिटे जप करावा).
१९. आवाजाचा उपयोग करून आपण आपली वास्तू शुद्ध करू शकतो त्यालाच ध्वनी कर्म असे म्हणतात, यात ग्रंथ पठण, मंत्र पठण, शॊल्क पठण, मंजुळ घंट्यांची आवाज, पडद्याच्या खाली लावलेले घुंगरू, artificial धबधबा, कर्ण मधुर संगीत, windchime यांचा समावेश होतो, यामुळे घरातील वातावरणात प्रसन्नता निर्माण होते व उत्साहवर्धक वाटते.
२०. वरील सांगितल्यानुसार आपल्या घरातील door बेलचा आवाज, टीव्हीचा आवाज, बोलणे अती कर्कश व मोठ्याने असू नये.

२१. जोम उत्साहाचे प्रतीक म्हणून सरळ उंच वाढणारा हिरवागार बांबू पूर्व दिशेस लावावा. दीर्घायु व स्वास्थ्याचा लाभ होतो
२२. स्वयंपाकघर पूर्वेस (त्यातही शक्यतो आग्नेयेस) असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते (पूर्वी असे होत होते आता कालानुरूप त्याचे स्वरूप पालटले आहे) तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा.
२३. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक. (मध्यंतरी, या संमधीचा एक वैज्ञानिक लेख मी वाचला होता मिळाल्यास पोस्ट करेल)
२४. 'यमघंट' योगावर नवीन गृहप्रवेश कधीही करू नये.
२५. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पुजा करावी.
२६. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते. अन्यथा निदान आठवडयातून किंवा महिन्यातून एकदा तरी कर्पुर होम करावा.
२७ धनदायी नक्षत्र मृग , पृष्य , मघा , मूळ ह्या नक्षत्रात तुम्ही तुमची कामे/व्यापार/व्यवसाय सुरू करू शकता याने खूप फायदा होतो.
२८ घरात रोज हनुमान वडवनाल स्तोत्र म्हणावे त्याने घरात शांतता नांदते.
२९. रोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने स्वप्नातून दचकून उठणे, बारीक सारीक आजार होणे याल पासून रक्षण होते
३०. श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाचवेळी एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उत्तरेत विधिवत स्थापना करावी, याने आर्थिक लाभ होतो.
।।शुभम भवतू ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"