स्कंद पुराणात असे वर्णन आहे की ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून भगवंतांनी मंत्र रक्षणाकरिता या कलियुगात दत्तात्रेयांचा अवतार झाला गुरुपद परिसराच्या पूर्वेस धनपूर म्हणजे गाणगापूर आणि त्यांच्या पश्चिमेस गुरुदीप म्हणजे कुरवपूर आहे या भागात विष्णू आणि सरस्वतींच्या समन्वयाच्या नृसिंह सरस्वतींचा अवतार आहे. गुरुपद भागाचा आकार धनुष्याकृती आहे मधल्या भागी चंद्राला परमेश्वरीचे स्थान आहे ही देवी दत्ता त्यांवर कृपा करणारी अवधूत कृपावंती म्हणवली जाते . हिमालयात एक हजार शिष्यांना घेऊन देवीच्या दर्शनासाठी दत्त सन्नती येथे आले होते. असे वर्णन स्कंदपुराणात आलेले आहे.गाणगापूर व कुरवपूर हि दोनही दत्तस्थान नवीन नसून पुरातन काळापासून दत्तस्थान आहेत केवळ नरसिंह सरस्वतींच्या काळापासून दत्तस्थान नाहीत याची नोंद आढळते .भगवान दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आहे दत्तसंप्रदायात एकमुखी दत्ताची उपासना आगळी आहे असे काही उपासक मानतात तसा अभिमान पण काही स्थानातून आढळतो पण खरे पाहू गेल्यास ही उपासना श्रीपाद श्रीवल्लभ यांचीच आहे. पिठापूर स्थान पूर्वीच्या मद्रास प्रांतात गोदावरी जिल्ह्यात आहे पिठापूर जाण्याकरिता विजयवाडा विशाखापट्टण या साऊथ सेंट्रल रेल्वेने सामलकोट जंक्शनपासून ११कि.मि पिठापूर रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. पिठापूर प्राचीन माहिती लाभते ती महत्त्वाची ठरावी ही श्रीपाद यांची जन्मभूमी आहे सांप्रत आंध्र प्रांतात गोदावरी जिल्ह्याचे हे परगण्यांचे ठिकाण असून याचे प्राचीन नाव पुरुहतिकापूर -पीठिकापूर असे हाेते.या अवतारा पूर्वी पण येथे दत्त पीठ होते येथे कुकुटे शवराचे मंदिर आहे भगवान शंकरांनी कोंबड्याचे रूप घेऊन गयासयूरास येथे मारले.गया सुरांच्या शरीरावर देवांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते तर त्यांचे पाय पिठापूर येथे होते म्हणून या स्थानास पाद गया असे नाव मिळाले .गया सुराने देवास सांगितले होते की सूर्योदयापर्यंत उठणार नाही शंकरांनी कोंबडीच्या रूपाने बांग दिल्याने सकाळ झाली असे समजून गया सूर फसला येथे जवळच एक तलाव पाद गया- पूर्णगया नावाचे आहे हे स्थान दक्षिण काशी म्हणून समजतात राक्षसाचा वध केल्यावर देवेंद्रने येथे पाच माधव मंदिरे बांधली ती अनुक्रमे कुंती माधव ,वेणू माधव , अन्नवरम, द्राक्शावरम' भीमराव सत्यनारायण ही मंदिरे फार प्राचीन आहेत सभोवतालचा सर्व परिसर पिठापूर सह प्राचीन काळापासून पुण्य पद असाही इतिहासकालीन समुद्रगुप्त व चालुक्य वंशीय राजे येथे शासक होते .तीन मुख आणि सहा हात एकमुख सहा हात असे दत्त विग्रह सर्वश्रुत आहे पण या स्थानात तीन मुख आणि चार हात अशी दत्तमूर्ती आहे सुमती राणीने अशा विष्णुदत्त स्वरूपाच्या दत्ताची उपासना केली होती पिठापूर येथे असे स्वयंभू दत्त मंदिर कुकटेश्वर पाठीमागे बाजूस आहे .पीठापूर हे क्षेत्र शतकापूर्वी कोणालाही माहिती नव्हते पू. टेंबे स्वामी यांच्यामुळे ते सर्वांना परिचयाचे झाले भाविकांना माहिती झाली तेथील स्थानिक राजकारणामुळे अपप्रचार व गैरसमज होत आला हे एक पिठापूर नावाचे शक्तिपीठ पण आहे येथील तळ्य़ात देवीचे पीठ पडले असे म्हणतात .बुद्धगया विष्णू गया तसे हे पाद गया यावरून पीठापूर हे नाव मिळाले असेही म्हणतात गुरुचरित्र वाचकांना पिठापूर नाव माहिती होते पण या स्थानाचा खरा परिचय दत्त भक्तांना वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांनी करून दिलेला आहे. येथे चाळीस पन्नास वर्षांपूर्वी दत्तभक्त समाज नावाची संस्था होती नंतर पुढे नवीन मंदिर झाले आणि श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान नावाची नवीन समिती बनली त्यांनी कार्य आरंभले श्रीपाद श्रीवल्लभ बाबतारा बद्दलची माहिती अधिक तर अशी गुरूचरित्र अध्याय पाच ते दहा मध्ये सिद्ध नामधारक संवादातून लाभतील त्यानंतर अलीकडे माधव सरस्वतींची संहिता एकादश पंचक अध्यायाच्या ग्रंथांच्या संशोधन यात्रेत खूपच नवीन माहिती उपलब्ध होत गेली ती पोथी पण नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या संशोधनात श्रीपादा बद्दल महत्त्वाची माहिती मिळते ती महत्त्वाची ठरते .(पुढे चालू )
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"