Sunday, June 2, 2019

करुणात्रिपादी

*⚜!!करुणात्रिपादी!!*

*👏शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।।*
*तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।।*
*तू आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।।*
*भयकर्ता तू भयहर्ता।* *दंडधर्ता तू परिपाता।*
*तुजवाचुनि न दुजी वार्ता।* *तू आर्ता आश्रय दत्ता (आश्रयदाता) ।।*
*👏शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।१।।*

*🌸अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।।*
*तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवू माथा।।*
*तू तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा?*
 सोडविता दुसरा तेव्हां। *कोण दत्ता आम्हां त्राता?*
*👏शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।२।।*

*🌸तू नटसा होउनि कोपी।* 
*दंडिताहि आम्ही पापी।*
*पुनरपिही चुकत तथापि।* *आम्हांवरी न च संतापी।।*
*गच्छतः स्खलनं क्वापि।* *असें मानुनि नच होऊ कोपी।*
*निजकृपा लेशा ओपी। आम्हांवरि तू भगवंता।।*
*👏शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।३।।*

*🌸तव पदरीं असता ताता।*
*आडमार्गीं पाऊल पडतां।*
*सांभाळुनि मार्गावरता।* *आणिता न दूजा (दुसरा) त्राता।*
*निजबिरुदा आणुनि चित्ता। तू पतितपावन दत्ता।*
*वळे आतां आम्हांवरता। करुणाघन तू गुरुनाथा।।*
*👏शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।४।।*

*🌸सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार।*
*तव पदी अर्पू असार। संसाराहित हा भार।*
*परिहरिसी करुणासिंधो। तू दीनानाथ सुबन्‍धो।*
*आम्हां अघ लेश न बाधो। वासुदे-प्रार्थित दत्ता।।*
*👏शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता...... ।।५।।*

*👏💐अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबर👏👏*


🔥 *शेज आरती* 🔥 

                 
*आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधुता ।*
*स्वामी अवधुता ।*
*चिन्मय, सुखधामी जाऊनी, पहुडा एकांता ।।*
*वैराग्याचा कुंचा घेऊनी चौक झाडीला ।*
*गुरु हा चौक झाडीला ।।*
*तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।*
*पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती ।सुंदर नवविधा भक्ती ।।*
*ज्ञानाच्या समया उजळुनी लाविल्या ज्योति ।।२।।*
*भावार्थाचा मंचक ह्रदयाकाशीं टांगिला ।*
*ह्रदयाकाशीं टांगिला ।।*
*मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।।*
*द्वैताचे कपाट लोटुनी एकत्र केले ।*
*गुरु हे एकत्र केले ।।*
*दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनी पडदे सोडीयले ।।४।।*
*आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनी* *गलबला ।गुरु हा सांडुनी गलबला ।।*
*दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला ।।५।।*
*अलक्ष उन्मनी घेउनी नाजुकसा शेला ।*
*गुरु हा नाजुकसा शेला ।।*
*निरजंनी सदगुरु माझा निजे शेजेला ।।६।।*

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘

*!! श्री अवधूत चिनंतन श्री गूरू देव दत्त दत्त !!*
*!! श्री तुळजा भवानी माता की जय !!*
 *!!श्री सद्गुरू साई नाथ महाराज की जय !!*  
*!! श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!*
*!! श्री सद्गगुरू शंकर बाबा महाराज की जय !!*
*!! श्री सद्गुरू भालचंद्र महाराज की जय !!*
*!!श्री सदगुरू धर्मराज महाराज कि जय!!*
*!! श्री बजरंग बली हनुमान की जय !!*
*!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा*!!
*!!गुरु चरण सेवा हीच खरी  देव पूजा*!! 
*!!गुरू हा संत कुलीचा राजा*!!
*!!गुरू हा प्राण विसावा माजा*!!
 *!!गुरू विण देव नाही दुजा*!!
      🌹 *शुभ रात्री* 🌹
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"