Saturday, June 15, 2019

दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे ही भाग्याची गोष्ट आहे

#दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे ही भाग्याची गोष्ट आहे, मात्र त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन हि गोष्ट अत्यावश्यक ठरते. त्या पालनात काही त्रुटी राहिल्यास  दंड ठरलेलाच. त्यात काही सूट नाही, पण ह्या पावित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एवढा भाग्यवान कोणी नाही. उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे.  

दत्त महाराजांची काय  प्रतिज्ञा आहे ? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत. कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणारही नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित. 

भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहेत. इतक सगळं असताना दत्त भक्तांची संख्या फार मर्यादित दिसते याचे काय कारण असावे ? तर दत्तभक्तीचे दुर्लभत्व, म्हणून आपण सगळे पाहत असतो की बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही. हे योग प्रारब्धात असावे लागतात. अनंत जन्मांची पुण्याई असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"