*‼️अनमोल कथा!‼️*
🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜🦜
✍🏼अतिथींचा सत्कार.
रस्त्याने चालणारी अशीच दोन माणसे राजस्थानच्या वाळवंटातून चालले होते. चालता-चालता रस्त्यात रात्र झाली. त्यांनी विचार केला की, कोणत्यातरी ठिकाणी थांबून विश्रांती घेतली पाहिजे. ते थांबण्यासाठी कुठेतरी जागेचा शोध घेत होते तेवढयात त्यांची नजर एक घरावर पडली. ते त्या घराजवळ गेले आणि त्यांनी दरवाजा वाजवला. घराचा मालक सोहनलाल बाहेर आला. दोन व्यक्तींना तेथे उभे राहिलेले बघून त्याने विचारले, "तुम्ही कोण आहात? एवढया रात्री येथे काय करत आहात?"
त्या दोघांनी सांगितले, "आम्ही दोघे रस्त्याने जात होतो, खूप रात्र झाली म्हणून आम्हाला थांबण्यासाठी आश्रय पाहिजे होता. जर आपल्याला त्रास होणार नसेल तर आम्ही आजची रात्र येथे तुमच्याकडे थांबू शकतो का?"
सोहनलालने त्यांना अतिशय आदराने आत बोलाविले आणि घरात जे काही खायला होते, ते त्यांना दिले. ते दोघेही जेवण करून झोपून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघे लवकर उठले. त्यांनी आपले हात-तोंड धुतले आणि सोहनलालच्या डोक्याजवळ काही पैसे ठेवले आणि ते निघून गेले. ते दोघे थोडे दूर गेले असतील तर मागून त्यांना हाक मारण्याचा आवाज आला, "थांबा!" त्यांनी मागे वळून पाहिले, तर सोहनलाल पळत येत होता. त्याला बघून ते दोघेही थांबले.
सोहनलाल त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, "असे अचानक तुम्ही दोघे निघून का आले? माझ्याकडून काही चूक झाली का?"
ते दोघेही सोहनलालला समजावत म्हणाले, "अरे, असे काहीच नाही मित्रा! तू तर आमच्यासाठी खूप काही केले आहे. आम्हाला फक्त लवकर जायचे होते म्हणून निघालो, बाकी काही नाही."
सोहनलालने त्यांच्या हातात पैसे देऊन म्हणाला, "घाईघाईमध्ये आपण हे पैसे माझ्या घरीच विसरून आला होतात. तेच परत करायला मी आलो होतो."
ते दोघे म्हणाले, "नाही सोहनलाल, ते तर आम्ही तुझ्यासाठी ठेऊन आलो होतो."
सोहनलाल म्हणाला, "मला त्याची आवशक्ता नाही. तुम्ही हे पैसे देऊन माझ्या आपलेपणाची आणि अतिथि सत्काराची परतफेड करताय का? तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही ती परतफेड ह्या पैस्याने करू शकणार नाही."
त्या दोघानांही सोहनलालच्या बोलण्याचा अर्थ समजला की, जो माणूस अडचणीत मदत करतो, त्याचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. त्यांनी काही न बोलता पैसे घेतले आणि सोहनलालला धन्यवाद म्हणून ते पुढे जायला निघाले.
👉🏼बोध.
यावरून आपणास समजते की, आत्मीयता आणि अतिथि-सत्काराचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही ! पैसा वापरुन तर नाहीच नाही! .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍🏼लक्ष्मीची कृपा.
सेठ करोडीमल नावाचा एक मनुष्य होता. लक्ष्मीची त्याच्यावर फार कृपा होती. हळुहळु त्याला या गोष्टीचा गर्व वाटू लागला.
एके रात्री त्याच्या स्वप्नात लक्ष्मी आली आणि म्हणाली, "शेठ करोडीमल! तुला गर्व झाला आहे. मी काही काळासाठी तुला सोडून गंगेच्या पलिकडे फकीरा हलवाईकडे चालले आहे."
ते ऐकून करोडीमलचे डोळे उघडले आणि तो पटकन उठला. दुसऱ्या दिवशी त्याने सगळे धन घराच्या छपरामध्ये असलेल्या कडयांमध्ये लपवून ठेवले. परंतु त्याचे नशीब खराब, चांगले नव्हते. काही दिवसानंतर भूकंप झाला आणि शेठजींच्या घराचे छप्पर खाली पडून गेले. त्या कडया गंगेमध्ये वाहून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचल्या. गंगेच्या किनाऱ्यावर बसलेल्या नाविक बुलाकीने जेव्हा त्या कडया बघितल्या, तेव्हा त्याने त्या फकीरा हलवाईला विकून टाकल्या. जेव्हा फकीराने त्या कडया लोहाराला तोडण्यासाठी दिल्या, त्यातून सोन्याची नाणी निघाली. फकीरा ती सोन्याची नाणी घेऊन आपल्या घरी आला.
तिकडे शेठजींची परिस्थिती खूप वाईट होती. त्यांना माहित होते की त्यांची लक्ष्मी फकीराच्या जवळ गेली आहे. एक दिवस त्यांनी विचार केला, असे केले तर की, मी फकीराजवळ जाऊन विनंती करू की माझी लक्ष्मी मला परत दे.
तो दोन पोळया घेऊन घरातून निघाला. बुलाकी नाविक याने त्याला गंगेच्या किनाऱ्यावर सोडले आणि पैसे मागितले. करोडीमल म्हणाला, "माझ्याजवळ देण्यासाठी पैसे नाहीत मी परत आल्यावर देतो' पोळया आहेत, त्यातील एक पोळी तू घे" नाविकने ते म्हणणे मान्य केले. गंगेच्या पलिकडे गेल्यावर करोडीमल सरळ फकीरा हलवाईकडे पोहोचला आणि त्याने सर्व गोष्ट त्याला सांगितली. फकीराला त्यांची दया आली आणि त्याने दोन लाडू करोडीमलला दिले. ज्यात सोन्याची नाणी लपवलेली होती. करोडीमलला काहीच समजले नाही आणि तो ते दोन लाडू घेऊन गंगेच्या पलिकडे जाण्यासाठी नाविककडे पोहोचला. नाविकाने त्याच्याजवळ जेव्हा पैसे मागितले तेव्हा निराश झालेल्या करोडीमलने ते दोन लाडू त्याला दिले , आणि सांगीतले की मी ज्या कामासाठी गेलो होतो ते काहि झाले नाही' असे म्हणुन तो आपल्या घरी निघून आला.
बुलाकीने परत आल्यावर विचार केला एवढे मोठे लाडू खाऊन मी काय करणार? आणि असेही भाकरीने माझे पोट भरले आहे परंतु घरच्यांचे काय ?असा विचार करून त्याने काही पैसे घेऊन ते लाडू फकीराला विकून टाकले.
म्हणूनच म्हंटले आहे की, "लक्ष्मीला जेथे रहायचे असते तेथेच ती जाते, भूकंप, नाविक, कडया तर फक्त एक निमित्त आहे."
👉🏼बोध.
यावरून आपणास समजते की, लक्ष्मीची कृपा धन आणि पैसा ह्या गोष्टी भाग्यानेच प्राप्त होतात!.
*संकलन- अरुण भाऊ पगार.*
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"