श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज
स्वामी महाराजांचा कारंजा मुक्कामी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म स्थान शोधून काढले .
नरसीचा दोन महिन्याचा मुक्काम आटपून पुढील प्रवासा साठी स्वामी महाराज निघाले
चौथे दिवशी स्वामी महाराज वाशीम ईथे करूणेश्वराच्या देवळात मुक्कामाला होते वाशीमकर मंडळींने महाराजांना आग्रहाने दोन दिवस ठेऊन घेतले .तेथिल वकील श्री
नारायणराव धनागरे यांचे वडिल आजारी असल्याचे त्यांच्या कडे भिक्षेस गेल्यावर समजले त्यांनी त्यांना करूणेश्वर मंदीरात
येण्यास सांगितले देवळात आल्यावर महाराजांनी एक यंत्र लिहून दिले व ते एका
ताईत मध्ये घालून आजारी व्यक्तीच्या गळ्यात घालण्यास सांगितले फक्त त्याला काढून न ठेवण्यास सांगितले मरणासन्न असलेले त्यांचे वडिल हळूहळू पुर्ववत झाले
वाशीम वरून स्वामी महाराज हिंगोली मार्गे
श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मगांवी आले तो पर्यत हे स्थान नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्म स्थान आहे हे गाववासीयांना माहित नव्हते स्वामी महाराजांचा मुक्काम हातोटीपूरा येथिल काळ्या मारोती मंदीरात होता .कारंजा येथिल वास्तव्यात स्वामी महाराजांना श्री घुडे यांच्या वाड्यातील ऊजव्या बाजूच्या माडीवर एक रात्र व्यतीत करण्याचा योग आला त्यावेळी स्वामी महाराजांनि श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री वासुदेवानंद सरस्वतींना साक्षात दर्शन दिले आणि माझे वास्तव्य येथे आहे असे सांगितले यानंतर स्वामी महाराजांनी काळजीपुर्वक तपास करून एक विशिष्ट ठिकाणच महाराजांचे जन्मस्थान आहे असे निश्चित केले त्याप्रमाणे तेथिल गाववासीयांना हे श्री गुरूमहाराजांचे जन्म स्थान आहे त्या जागी तुलसीवृंदावन
बांधून त्याची पुजा अर्चा करावी म्हणजे आपणावर सदगुरूकृपा होईल असे सांगितले .
पुढे श्रीब्रम्हीभूत ब्रम्हानंद महाराज तथा लिलादत्त स्वामी हे माहूर ला जाण्यासाठी आले असता त्यांना ग्रामवासियांकडून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मस्थानाची माहिती कळली त्यानुसार त्यांनी जन्मस्थानाचे दर्शन घेऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे मुर्तीसह मंदीर बांधावे अशी त्यांना श्रींची आज्ञा आहे असे ग्रामस्तांना सांगितले .व पुढाकार घेऊन निर्गुण पादुका व मुर्तीची स्थापना केली .
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी
श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म स्थान शोधून काढले तसेच त्यांनी पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचे ही जन्म स्थान श्री वासुदेवांनद सरस्वती स्वामी महाराजांनी शोधून काढले .
।। श्री गुरूदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"