Saturday, February 16, 2019

रथसप्तमी कथा आणि महत्व.

रथसप्तमी कथा आणि महत्व.

मकरसंक्रांती नुकतीच झाली आज पौष अमावस्या उद्या पासून माघ माघ महिना सुरु होतोय माघ सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या दिवशी सूर्य आपल्या रथावर आरूढ होतो आणि पुढील मार्गक्रमण करतो आशी अख्यायिका आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. वैज्ञानीक दृष्टीकोनातून बघितले तर सूर्य किरणांपासून मिळणारे विटामिन 'D' आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते आहे. तर अशा या रथसप्तमी ची कथा आणि त्याचे महत्व जाणून घेऊया.
रथसप्तमी कथा
पौराणिक कथे नुसार भगवान श्रीकृष्ण यांचा मुलगा शाम्ब याला आपल्या शारीरिक ताकदीवर खूप गर्व होता.

एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आले असता त्यांची शारीरिक दुर्बलता बघून शाम्ब याने तपस्वी दुर्वास ऋषींची खिल्ली उडवली आणि त्यांचा अपमान केला. याने क्रोधीत होऊन दुर्वास ऋषींनी शाम्ब ला कुष्ठरोग होण्याचा शाप दिला. शाम्बची ही अवस्था पाहून भगवान श्रीकृष्णाने शाम्बला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. सूर्याची उपासना केल्याने शाम्बची कुष्ठरोगा पासून मुक्तता झाली.
यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा आराधना केल्याने आरोग्य, पुत्र, धन याची प्राप्ती होते. तसेच शारिरिक दुर्बलता, हाडांचा कमकुवतपणा, सांधे दुखी, त्वचेचे विकार दूर होतात. यादिवशी सूर्याची पूजा करून मातीच्या भांड्यात दुध आणि तांदुळाची खीर बनवतात.रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.[१][२]

सूर्य मंदिर कोणार्क
महत्व 

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.[३] त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते.सूर्याच्या सोन्याची प्रतिमा रथात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढली जाते. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. या दिवशी सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.[४]या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो.[५] [६] महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात.

भारताच्या विविध प्रांतात 

दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो.संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्व आहे.[७] या दिवशी सूर्यपूजन केले जाते.[८]रथसप्तमी

रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर तांबड्या चंदनाने सात घोड्यांचा रथ काढून त्या रथांत सारथ्यासह सूर्याची प्रतिमा काढतात.

नंतर तांबडे गंध, तांबडी फुलें वगैरे पूजेचे साहित्य घेऊन पूजा करतात. सूर्याला नैवेद्याकरिता खीर करतात. या दिवशीं मातीच्या भांड्यांत दूध घालून ते भांडे अंगणांत गोवर्‍या पेटवून त्याच्यावर दूध उतास जाईपर्यंत ठेवतात.माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी हा सूर्याचा उत्सव

सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो.
या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.

कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.

माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.भगवान श्रीविष्णूचे एक रूप असलेल्या श्री सूर्यनारायणाच्या उपासनेचा दिवस :
 रथसप्तमीच्या निमित्ताने  या दिवशी आहे. त्यानिमित्त रथसप्तमी आणि सूर्योपासना यांचे महत्त्व अन् त्या दिवशी करावयाचा सूर्यदेवाचा पूजाविधी, यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

१. 'रथसप्तमी' हा सूर्यदेवाचा जन्मदिन !

'माघ शुक्ल पक्ष सप्तमीला 'रथसप्तमी' असे म्हणतात. महर्षि कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला, तो हा दिवस ! भगवान श्रीविष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत. संपूर्ण विश्‍वाला आपल्या महातेजस्वी स्वरूपाने प्रकाशमय करणार्‍या सूर्यदेवांमुळे पृथ्वीवर जीवन अस्तित्वात आहे.

२. सूर्याचे उत्तरायणात मार्गक्रमण होत असल्याचे सूचक असलेला रथसप्तमीचा सण !

रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. 'श्री सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत', अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकर्‍यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणार्‍या तापमानाचा दर्शक असतो, तसेच वसंत ऋतू समीप आल्याचा सूचक असतो.

३. जीवनाचा मूळ स्रोत असलेला सूर्य !

सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे. सूर्यकिरणांतून शरिराला आवश्यक असलेले 'ड' जीवनसत्त्व मिळते. काळाचे मोजमाप सूर्यावरच अवलंबून आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. तो स्थिर असून अन्य सर्व ग्रह त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात.

४. हिंदु धर्मातील सूर्योपासनेचे महत्त्व

सूर्योपासनेला हिंदु धर्मात पुष्कळ महत्त्व आहे. सूर्याला प्रतिदिन पहाटे अर्घ्य दिल्याने अंधःकार नष्ट करून जग प्रकाशमय करण्यासाठीचे बळ सूर्याला प्राप्त होते. (उपासनेमुळे मूर्ती जागृत होते, तसे हे आहे.) सूर्यनमस्कारामुळे शरिरातील अनिष्ट शक्तींची स्थाने नष्ट होण्यास पुष्कळ साहाय्य हाते.

५. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवीचे (म्हणजे सूर्याचे) महत्त्व

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या रवि (म्हणजे सूर्य) हा आत्माकारक आहे. 'मानवी शरिरातील प्राण, आत्मिक बळ आणि चैतन्यशक्ती यांचा बोध रवीवरून होतो', असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील रवि जितका बलवान, तितकी त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती उत्तम असते. राजा, प्रमुख, सत्ता, अधिकार, कठोरता, तत्त्वनिष्ठता, कर्तृत्व, सन्मान, कीर्ती, आरोग्य, वैद्यकशास्त्र इत्यादींचा कारक रवि आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्‍व सप्ताहातील सात वार दर्शवतात. रथाला असणारी बारा चाके बारा राशी दर्शवतात.

६. रथसप्तमीला करावयाचा सूर्यदेवाचा पूजाविधी

रथसप्तमीला व्यक्तीने अरुणोदयकाली स्नान करावे. सूर्यादेवाची १२ नावे घेऊन न्यूनतम १२ सूर्यनमस्कार घालावेत. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. सूर्याला प्रार्थना करून आदित्यहृदयस्तोत्रम्, सूर्याष्टकम् आणि सूर्यकवचम्, यांपैकी एखादे स्तोत्र भक्तीभावाने म्हणावे किंवा ऐकावे. रथसप्तमीच्या दिवशी कुठलेही व्यसन करू नये. रथसप्तमीच्या दुसर्‍या दिवसापासून प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करावी आणि सूर्यनमस्कार घालावेत. त्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते.'
🌹।।ऊँ सुर्यनारायण नमः श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चरण स्पर्श।।🌹

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"