सोमवती अमावस्या पर्वकाळ
_____________________________
काही सोपे,अनुभविक तोडगे खाली देत आहे श्रध्देने केल्यास नक्की फळ मिळेल असा अनेकांचा अनुभव आहे.ज्यांना विश्वास असेल,श्रध्दा असेल त्यांनी करावा.
_____________________
_____________________________
१) आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
_____________________________
अमावस्येच्या आदल्या दिवशी बेलाच्या झाडाच्या मुळाशी हळद कुंकू अक्षद वाहून आमंत्रण द्यावे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ चे सुमारास बेलाची मुळी तोडून आणावी तिला दूध पाणी घालून पूजा करावी व तिजोरीत ठेवावी हळू हळू आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल
_____________________________
२) उधारी वसूल होण्यासाठी किंवा अडकलेले पैसे मिळण्यासाठी
_____________________________
अमावस्येच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी लाल मिरचीच्या २१ बिया घातलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावा म्हणजेच सूर्या कडे पाहून ते पाणी अर्पण करावे अडकलेले पैसे मिळण्यासाठी मदत होते
_____________________________
३) कुटुंब सुखी समृद्ध होण्यासाठी
_____________________________
दर अमावस्येच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी थोडे काळे तीळ घरातील प्रत्येक व्यक्ती ची पुढून ७ व मागून ८ वेळा उतरवून घराच्य उत्तर देशेला बाहेर फेकून द्यावी याच्याने कुटुंबातील प्रत्येक मेहनती हाताला मनासारखे यश लाभते व कुटुंब सुखी समृद्ध होते
_____________________________
४) अनेक व्यक्तींना खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही त्यासाठी
_____________________________
अमावस्येच्या दिवशी बेसनाचे ७ लाडू करावे घरातील कर्ता पुरुष किंवा ज्याला अडथळे येत आहेत अश्या व्यक्ती वरून ७ वेळा ओवाळून घराबाहेर ठेवावे व दुसऱ्या दिवशी तांबड्या रंगाच्या गाईला खावू घालावे असे सलग ७ अमावस्या करावे संध्याकाळी हा प्रयोग करावा हे जरी ७ महिन्याचा प्रयोग असला तरी जसे जसे दर महिन्याला कराल तसा तसा अनुभव येत जाईल.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"