Wednesday, February 27, 2019

॥ धार्मिक कार्यात नेहमी लागणारी माहिती ॥

॥ धार्मिक कार्यात नेहमी लागणारी माहिती ॥

1) पंचामृत :- दूध, दही, तूप, मध, साखर.

2) पंचगव्य:- गोमुत्र, गोमय(गाईचे शेण) दूध, दही, तूप.

3) पंचखाद्य:- खोबरे, खारीक, डाळ, पोहे, लाह्या.

4) पंचरत्न:- सुवर्ण, चांदी, मोती, पोवळे, राजावर्त(हिरा).

5) पंचरंग:- रांगोळी- पांढरी, लाल, पिवळी, हिरवी, काळी.

6) पंचपल्लव:- डहाळे(टाळे) वड, पिंपळ, उंबर, पायर, आंबा.

7) पंचत्वचा:- झाडाच्या साली:- वड, पिंपळ, जांभूळ, आंबा, पायर.

सप्तमृत्तिका:-

१) गजस्थान – हत्तीच्या पायाखालील माती.

२) अश्वशाला:-घोडे जेथे ठेवण्याची जागा असते तेथील माती.

३) चवाठा :- चार रस्ते जेथे एकत्र येतात तेथील माती.

४) संगम :- दोन नद्यांचा संगम जेथे होतो तेथील माती.

५) वारूळ :- मुंग्या जेथे राहतात त्या वारूळातील माती.

६) डोह :- एखाद्या ठिकाणी भरपूर पाणी साठते(नैसर्गिक)तेथील माती.

७) गोठा :- गाई, म्हौस बांधण्याची जागा तेथील माती.

९) सप्तधान्य :- सातू, गहू, तीळ, कांग, सावे, चणे, साळी.

१०) समिधा:- रुई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, उंबर, शमी, दूर्वा, दर्भ.

|| शुभं भवतु ||

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"