Thursday, February 21, 2019

स्वामी महाराजाच्या कृपेने मृत बालक जीवंत झाले

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .

स्वामी महाराजाच्या कृपेने मृत बालक जीवंत झाले .

श्री स्वामी महाराज तंजावर ला असतांना स्नानासाठी कावेरी नदीवर जातांना पुढे श्री शिष्यमंडळी व श्री गांडामहाराज असे निघाले वाटेत कुठे घाण केरकचरा असल्यास बाजूला करीत चालता चालता कपड्यात गुंडाळून ठेवलेले एक लहान गाठोडे या मंडळीच्या दृष्टीस पडले त्यांनी ते उघडून बघीतले तेव्हा त्यात एक मेलेले मृत बालक आढळले त्यावर श्री गांडामहाराज म्हणाले कोणीतरी बाईने आपले मृतबालक गुंडाळून ईथे टाकून दिले त्यावर स्वामी महाराज म्हणाले की हे मेलेले नाही त्याच्या अंगाला भस्म चोळा म्हणजे हे जागे होईल आणि झाले ही तसेच ते बालक सावध होऊन रडू लागले आडोशाला ऊभी असलेली बाई धावत येऊन तिने बालकाला जवळ घेतले आणि स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि नम्रपणे म्हणाली माझी दोन्ही मूले गेल्यामूळे आणि हाही मृत
बालक आपल्या चरणस्पर्शाने तरी जीवंत व्हावा म्हणून मी त्याला आपल्या वाटेत गुंडाळून ठेवले आपणास अशा प्रकारे त्रास दिला त्याबद्दल क्षमा असावी आपण माझ्यावर जी कृपा केली त्याबद्दल मी जन्मोजन्मी आपली ऋणी राहील असे म्हणून तिने साष्टांग दंडवत घातला .
अशा रितीने स्वामीमहाराजांनी मृत बालक जीवंत केले .
        ।।। श्री गुरूदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"