अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ न अत्तर घेता आपण नुसते बसलो तरी आपल्याला फुकटचा वास मिळतो.
" गुरू हा त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. " त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी देहातून - मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात, त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात, त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो.
म्हणूनच म्हणतात,
न लगे मुक्ती, धन, संपदा...
संत संग देई सदा...
म्हणून चांगल्या लोकांची संगत असेल तर मनुष्य वाईट मार्गाने जाऊनच शकत नाही.
श्री स्वामी समर्थ 💐💐
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"