Thursday, February 21, 2019

पारायण

"पारायण" करणे म्हणजे नक्की काय करणें हा प्रश्न कधीच तत्ववेत्ता साधकांकडुनही विचारण्यात किंवा उल्लेख ही केला गेला नाही. आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी गाठली ही महत्त्वाची, की जी योगक्रिया केली त्याचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची...! हा प्रश्न नेहमीच मला पडतो.

श्री गुरुचरित्र सिद्धमंत्रग्रंथ हा पाचवा वेद आहे. या गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलिभुत होणेसाठी त्याअधी सर्व अपेक्षित मानसिक व शारीरिक पुर्वतयारी होणे अतिमहत्वाचे असे मला वाटते.

"पारायण" या शब्दाचा नेमका अर्थ काय...?
#पारायण हा शब्द "आत्मपरायण" तत्वाची अभिव्यक्ती आहे. "पारायण" याचा आ+परा+आयण असा अर्थ होतो. यात "आ" म्हणजे नारायणातील "आ" स्वरशक्ती. "परा" आपल्या शरीरातील नाभीवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्यंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगम वाणीच्या आलिकडे आहे. "आयण" म्हणजे आवाहन करणे.

"पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आवाहन असा अर्थ आहे"
श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याची अभिव्यक्ती ईतकीही समजणेहेतु सरळही नाही.

श्री गुरुचरित्राचे पारायण करणेआधी "श्रीगुरुचरित्र" या षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे ही प्रार्थमिकता असावी. उदा. विशालकाय वटवृक्षाचे अस्तित्वाची सुरवात एका बीजातुन होते. त्याच प्रमाणे श्रीगुरुचरित्र सिद्धग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातुनच करणे योग्य...!

"श्री गुरुचरित्र" या शब्दब्रम्हाचा मतीतार्थ असा कि, हे परब्रम्ह यतिराज श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु महाराज, माझ्या अज्ञानरुपी अंधःकाराचा समुळ नाश करुन माझे दास्यभक्तीयुक्त आचरण पवित्र व चारीत्र्य संपन्न करा.

सप्ताहकाळ वाचनात अथवा महाराजांच्या दत्तउपासनेत "सात" आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरुन ७ हा अंक दास्यभक्तीला अनुसरुन आहे. देहातीत सप्तपाताळ व षट्चक्र + सहस्त्रार एकूण सात चक्रांना अनुसरुन आहे.

श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बर्हीमुखी होऊन केल्यास इहलौकीक वैभव प्राप्त होते.

(Copy+Paste)
🙏🏼🙏🏼🙏🏼

#गुरुचरित्र #श्रीगुरुचरित्र

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"