Saturday, February 16, 2019

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .

चामरती गावात कृष्णामातेनेच स्वामी महाराजांच्या क्षौरविधीची सोय लावली 

स्वामी महाराज तंजावर वरून चामरती या ठिकाणी आहे पण ह्या ठिकाणी तेथिल लोकांनी त्यांनी मदत न करता निंदा केली पण स्वामी महाराजांनी शांतपणे ऐकून घेतले क्षौरविधीची काहीच व्यवस्था न झाल्याने स्वामी महाराजांनी कृष्णामातेपुढे आपले गार्हाने मांडले की हे माते आम्हास ऊद्या क्षौरविधी करावयाचा आहे पण ईथे काही व्यवस्था नाही जर ऊद्या क्षौरविधी केला नाही तर आपण क्षौर करणारच नाही  आणि दंडत्याग ही करू असे म्हणून झाडाखालीच निजले त्यावर कृष्णामातेने स्वप्नात दर्शन देऊन ऊद्या सर्व व्यवस्था होईल असे सांगितले .
ज्या रात्री महाराजांना स्वप्न पडले त्याच रात्री चामरती गावातील सर्व प्रमूखांच्या स्वप्नात येऊन रागाने कृष्णामातेने सर्वांना रागावले की माझ्याच तीरावर राहता माझेच पाणी पीता आणि गावात आलेल्या तपस्वीची यथेच्छ निंदा करता त्यांना शरण जा त्यांची सर्व सोय करा अन्यथा गावावर मोठे संकट येईल त्यांच्या क्षौरविधीची व्यवस्था करा हे स्वप्न पाहून सर्वजण खडबडून जागे जाले एकमेकांना सांगू लागले त्या सर्वानी महाराजांचा शोध घेतला त्यांच्या चरणी लागले आमच्या कडून अपराध केला आम्हास क्षमा करावी आणि स्वामी महाराजांची क्षौर विधीची व्यवस्था केली पुढे स्थानिंकांच्या आग्रहास्तव स्वामी महाराज पंधरा दिवस मुक्काम वाढवला .तिथून स्वामी महाराज पुढील चातुर्मासासाठी मुक्त्याला म्हणजे मुक्तीश्वरपूर ईथे आले .
        
।। श्री गुरूदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"