|| जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना ।
अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।।
कार्त्यावीर यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना ।
स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना ।।
नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना ।
मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना ।।
दासोपंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना ।
नाथ सदनिचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना ।।
युगायुगे निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना ।
बालोन्मत पिशाच्च वृत्ती धारण करता तुम्हीच ना ।।
स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना ।
करुनी भिक्षा करविरी भोजन पांचाळेश्वर तुम्हीच ना ।।
तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्र माहुरी तुम्हीच ना ।
करुनी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना ।।
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्हीच ना ।
श्रीपाद वल्लभ नृसिंहसरस्वती करंज नगरी तुम्हीच ना ।।
जन्मताच ॐ कार जपोनी मौन धरियिले तुम्हीच ना ।
मौंजी बंधनी वेद वदोनी जाननि सुखविली तुम्हीच ना ।।
चतुर्था श्रमा जीर्नोधारा आश्रम घेऊन तुम्हीच ना ।
कृष्ण सरस्वती सद्गुरु वदुनी तीर्था गमले तुम्हीच ना ।।
माधव अरण्या कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना ।
पोट शुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना ।।
वेल उपटोनी विप्रा दिधला हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना ।
तस्कर वधोनी विप्र रक्षीला भक्त वत्सला तुम्हीच ना ।।
विप्र स्त्रीयेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना ।
तीन जिव्ह वेद पाठी केला सजीव करुनी तुम्हीच ना ।।
वाडी नृसिंह औदुंबर ही वास्त्यव करुनी तुम्हीच ना ।
भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ।।
ब्रम्ह मुहूर्ती संगम स्थानी अनुष्ठानी रत तुम्हीच ना ।
भिक्षा ग्रामी करुनी राहता माध्यान्हि मठी तुम्हीच ना ।।
ब्रम्ह राक्षसा मोक्ष देऊनी उध्दरीले मठी तुम्हीच ना ।
वांझ महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना।।
नंदी नामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना ।
त्रिविक्रमा विश्व रूप दावुनी कुमसी ग्रामी तुम्हीच ना ।।
अगणित दीधले धान्य कापुनि शूद्रा शेत गुरु तुम्हीच ना ।
रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना ।।
आठ ही ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिनी तुम्हीच ना ।
भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना ।।
निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्ल्या तुम्हीच ना ।
सायंदेवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना ।।
चांडाळा मुखी वेद वदवले गर्व हराया तुम्हीच ना ।
साठ वर्ष वांझेशी दिधले कन्या पुत्र हि तुम्हीच ना ।।
कृतार्थ केला मानस पुजूनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना ।
माहूर चा सति पति उठवोनी धर्म कथियेला तुम्हीच ना ।।
रजकाचा यवनराज बनवूनी उध्दरीला गुरु तुम्हीच ना ।
अनन्यभावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना ।।
कर्दळी वनीचा बहाणा करुनी गाणगापुरी स्तिथ तुम्हीच ना ।
निर्गुण पादुका दृश्य ठेवुनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना ।।
विठाबाई चा दास मूढ परी अंगिकारिला तुम्हीच ना ।
आत्म चिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना।।
जगतवन्द अवधुत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना ।
अनन्यभावे शरणागत या मी भव भय वारण तुम्हीच ना ।।
🌹🙏🏻🌹👇🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"