Thursday, February 7, 2019

कामाख्या शक्तीपीठ गुवाहाटी*

----------------------------------------
*कामाख्या शक्तीपीठ गुवाहाटी*
-----------------------------------------

 आसाम च्या पश्चिमेला 8 किलोमीटर दूर निलांचल पर्वतावर आहे. देवीच्या सर्व शक्तीपीठांमध्ये कामाख्या शक्तीपीठ सर्वोत्तम मानले जाते. देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. 
धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते. 
*कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेले आहे.*
 आज आम्ही तुम्हाला कामाख्या शक्तीपीठाशी संबंधित  रोचक तथ्य सांगत आहोत...
 
*१)मंदिरात नाही देवीची मूर्ती*

या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते.

*२)येथे देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला*
या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.
 
*३)प्रसाद रुपात भक्तांना दिला जातो ओला कपडा*
येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.

*४)लुप्त झाले आहे मूळ मंदिर*
प्राचीन कथेनुसार, या ठिकाणी एक नरक नावाचा राक्षस होता. या राक्षसाने देवीसमोर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. देवी नरकसोबत लग्न करण्यास तयार नव्हती, यामुळे त्यांनी त्या राक्षसासमोर एक अट ठेवली. अटीनुसार नरकाने एका रात्रीतून या ठिकाणी मार्ग, घाट, मंदिर हे सर्वकाही निर्माण केले तर देवी त्याच्यासोबत लग्न करेल. ही अट पूर्ण करण्यासाठी नरकाने विश्वकर्मा यांना बोलावून काम सुरु केले. काम पूर्ण होताना पाहून देवीने रात्र संपण्यापूर्वीच कोंबड्याद्वारे सकाळ झाल्याचे भासवले आणि यामुळे लग्न होऊ शकले नाही. आजही पर्वतावर जाण्याच्या मार्गाला नरकासुर मार्ग नावाने ओळखले जाते. ज्या मंदिरात देवीची मूर्ती स्थापित आहे, त्या मंदिराला कामादेव मंदिर म्हणतात.
या मंदिरासंदर्भात सांगितले जाते की, नरकासुरच्या अत्याचारांमुळे कामाख्या देवीच्या दर्शनात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. यामुळे क्रोधीत झालेल्या महर्षी वशिष्ठ यांनी या जागेला शाप दिला. असे सांगितले जाते की, शापाच्या प्रभावाने काळाच्या ओघात कामाख्या पीठ लुप्त झाले आहे.

16 व्या शतकाशी निगडीत आहे आजच्या मंदिराचा इतिहास
प्राचीन मान्यतेनुसार 16 व्या शतकात कामरूप प्रदेशाच्या राज्यामध्ये युद्ध होऊ लागले. या युद्धामध्ये कूचविहारचे राजा  विश्वसिंह जिंकले. या युद्धामध्ये विश्वसिंह राजाचा भाऊ हरपला आणि आपल्या भावाच्या शोधात ते फिरत-फिरत निलांचाल पर्वताजवळ पोहोचले. तेथे त्यांना एक वृद्ध महिला दिसली. त्या महिलेने राजाला या जागेचे महत्त्व आणि कामाख्या पीठाविषयी सांगितले. त्यानंतर राजाने या ठिकाणी खोदकाम सुरु केले. या खोदकामात कामदेवच्या मूळ मंदिराचा खालचा भाग दिसून आला. राजाने त्याच मंदिराच्या वर आणखी एक मंदिर बांधले.  1564 मध्ये मुस्लिम आक्रमणामध्ये हे मंदिर तोडण्यात आले. हे मंदिर पुढच्या वर्षी पुन्हा विश्वसिंह राजाचा पुत्र नरनारायण यांनी बांधले.

*६)भैरव दर्शनाशिवाय अपूर्ण आहे कामाख्या यात्रा*
कामाख्या मंदिराजवळ उमानंद भैरवाचे मंदिर आहे. उमानंद भैरव या शक्तीपीठाचे भैरव आहे. हे मंदिर ब्रह्मपुत्र नदीच्या मध्ये आहे. असे सांगितले जाते की, यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामाख्या देवीची यात्रा पूर्ण होत नाही.

*केव्हा जावे -*
कामाख्या मंदिरात जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात उत्तम मानला जातो.

*कसे पोहोचाल*
कामाख्या मंदिरापासून 8 किलोमीटर अंतरावर गुवाहाटी आहे. गुवाहाटीमध्ये दळणवळणाचे सर्व साधन उपलब्ध आहेत. या ठिकाणी विमानतळसुद्धा आहे.

*मंदिराच्या जवळपासची इतर पाहण्यासारखे ठिकाण*

कामाख्या मंदिराजवळ नवग्रह मंदिर, महाकालभैरव मंदिर, ऋषी वशिष्ठ आश्रम, उमानंद शिव मंदिर. या व्यतिरिक्त येथे मदन कामदेव, भुवनेश्वरी देवी, मानस कुंड हे ठिकाण आहेत.
-----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"