Monday, February 4, 2019

आपले इष्ट दैवत आणि आराध्य दैवत कोणते?

आपले इष्ट दैवत आणि आराध्य दैवत कोणते? मी कोणत्या देवाची उपासना करू?
कुंडलीतील पंचम आणि नवम स्थाने या साठी महत्वाची आहेत. पंचम स्थान हे पूर्व संचित,धर्म,कर्म,बुद्धी,शिक्षण, भक्तीआणि इष्ट दैवत याची माहिती होते. 
नवम स्थानावरून उपासना व त्याचा स्थर समजतो. आता आपण प्रत्येक लग्नासाठी कोणत्या देवाची किंवा देवीची पूजा आराधना उपासना करावी ते पाहू. त्या साठी खालील दोन कोष्टक पाहा. कोष्टक एक ग्रहांप्रमाणे दुसरे राशी प्रमाणे._____________________________________________________________________________
१) रवी --देवता विष्णू , किंवा राम २) चंद्र ---कृष्ण  ३) मंगळ --नृसिह, खंडोबा ४) बुध --भगवान बुद्ध ५) गुरु -- वामन ६) शुक्र --परशुराम  ७) शनी --कूर्म  ८) राहू --वराह  ९) केतू --मत्स्य _____________________________________________________________________________________________
१) मेष --सूर्य,विष्णू, २) वृषभ --गणपती  ३) मिथुन --सरस्वती, तारा,लक्ष्मी, ४) कर्क -- हनुमान ५) सिहं --शिव  ६) कन्या भैरव, हनुमान, काली ७) तुला -- भैरव,हनुमान ८) वृश्चिक-- शिव ९) धनु --हनुमान  १०) मकर-- सरस्वती,लक्ष्मी ११) कुंभ -- गणपती १२) मीन --दुर्गा,सीता, कोणतीही देवी. _____________________________________________________________________________________________
जर आपले 
१) धनु लग्न असेल तर पंचमात मेष रास आणि नवमात सिहं रस येईल. वर दिल्या प्रमाणे मेषेचा मंगळ म्हणून नरसींह आणि मेष राशीसाठी सूर्य,विष्णू आता नवमात सिंह रास वरील कोष्टका प्रमाणे सिंह राशीस शिव स्वामी रवी म्हणून विष्णू राम याचा विचार एकत्र केला तर या लग्नाच्या लोकांनी इष्ट दैवत म्हणून रामाची तर उपासना हनुमानाची करावी म्हणजे लवकर फळ प्राप्त होईल. त्या प्रमाणे रामचा हनुमानसह असलेला फोटो लावला तर उत्तम. रामाची व हनुमानाची स्तोत्रे,मंत्र पूजा,अर्चा,उपास वगैरे फलदाई. 
२) मकर लग्नास पंचमात वृषभ राशी तर नवमात कन्या राशी येईल. वृषभ राशीस गणपती कन्या राशीस भैरव,हनुमान,काली. वृषभेचा शुक्र व दैवत लक्ष्मी,गौरी,पार्वती. कन्येचा बुध दैवत दुर्गा, गणेश ---या जातकांनी  गणपतीसह पार्वतीची उपासना करावी म्हणजे उत्तम फलदाई. 
३) कुंभ लग्न असता पंचमात मिथुन तर नवमात तुला राशी येईल. वरील कोष्टक प्रमाणे सरस्वती, तारा,लक्ष्मी,भैरव, हनुमान,दुर्गा,गणेश आणि लक्ष्मी येणे प्रमाणे देवता येतील. याचा एकत्रित विचार करता. या जातकांनी लक्ष्मी गणेश उपासना उत्तम ठरते. 
४) मीन लग्नास पंचमात कर्क तर नवमात वृश्चिक राशी येईल. वरील कोष्टकाप्रमाणे --हनुमान,शिव,पार्वती, कृष्ण,या जातकांनी रामाची व हनुमानाची उपासना कारावी.
५) मेष लग्नास पंचमात सिंह राशी तर नवम स्थानात धनु राशी येईल. वरील कोष्टकाप्रमाणे महादेव (शिव), सूर्य, विष्णू, दत्त, ब्रम्हा, वामन, या जातकांनी महादेव किंवा हनुमान किंवा दत्ताची उपासना केल्यास उत्तम. 
६) वृषभ लग्नास पंचमात कन्या राशी तर नवम स्थानात मकर राशी येईल. त्यासाठी भैरव (बहिरोबा,) हनुमान ,काली, सरस्वती,लक्ष्मी, दुर्गा, गणेश,इत्यादी. या जातकांनी शंकर पार्वती आणि गणेश एकत्र असलेले चित्र घरात  लावले तर उत्तम तसेच यांची उपासना करावी. 
७) मिथुन लग्नास पंचमात तुला राशी तर नवमात कुंभ राशी येईल. वरील कोष्टकाप्रमाणे कूर्म, दुर्गा, गणेश,भैरव,हनुमान, लक्ष्मी,या लोकांनी गणपती व हनुमानाची उपासना करावी. 
८) कर्क लग्नास पंचमात वृषभ राशी तर नवम स्थानात मीन राशी येईल. हनुमान, विष्णू , गुरु,शिव,दुर्गा, सीता,कोणतीही देवी. या जातकांनी शंकर पार्वती सह असलेला फोटो लावावा तसेच यांची आराधना उपासना फलदाई.
९) सिंह लग्नास पंचमात धनु राशी येईल तर नवमात मेष राशी येईल. दत्त, हनुमान,सूर्य,विष्णू या जातकांनी रामासह हनुमानाची पूजा उपासना करावी. 
१०) कन्या लग्नास पंचमात मकर राशी तर नवमात वृषभ राशी येईल.  भैरव, हनुमान,लक्ष्मी,गौरी,सरस्वती,गणपती. या जातकांनी शंकर पार्वती गणेश यांची उपासना आराधना केल्यास उत्तम. 
११) तुला लग्नास पंचमात कुंभ राशी तर नवमात मिथुन राशी म्हणून   भैरव, हनुमान,दुर्गा,तारा,लक्ष्मी,गौरी,सरस्वती,गणपती. या जातकांनी शंकर,हनुमान आणि गणपतीची उपासना करावी. 
१२) वृश्चिक लग्नास पंचमात मीन राशी तर नवमात कर्क राशी येईल. दत्त,विष्णू,शिव,पार्वती,कृष्ण,दुर्गा सीता तारा लक्ष्मी. या जातकांनी दत्त,शिव,सरस्वती यांची उपासना आराधना केल्यास उत्तम.
 लेखक - श्रीरंग मधुकर कुलकर्णी.

1 comment:

  1. जन्म 27 ऑगष्ट 1960
    जन्म वेळ 19:28
    जन्म ठिकाण मुंबई-परेळ
    माझी ईष्ट देवता कोणती?

    ReplyDelete

im writing under "Comment Form Message"