Monday, February 11, 2019

तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म ◆

◆ तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म ◆ तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र तुळस, राम तुळस, बाबी तुळस आणि तुकाशामीय तुळस. उष्णतेच्या विकारात तुळशीचे बी पाण्यात भिजत घालून त्याची खीर घेतात. अर्धांगवायू आणि संधिवात यात तुळशीच्या पानांच्या काढ्याची वाफ घेतात. निद्रानाशावर काळ्या तुळशीच्या पानांच्या गोळ्या घेतात. एकाग्रता वाढवण्याचा गुण हि तुळशीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पानांच्या सेवनाने विशेष उपोयोग होओ. प्रसिद्ध चिकित्सक डोक्टर उपेन्द्र रे यांनी संशोधनाने सिद्ध केले आहे कि तुळशीच्या पानात कर्करोग , हृदयरोग, किड्नीचे विकार आणि त्वचा रोग बरे करण्याची अपूर्व शक्ती आहे. बारीक ताप, खोकला, सर्दी या विकारात तुळस गुणकारी आहे तसेच तुळशीची पाने डासांना दूर पळवितात.
प्रख्यात निसर्ग उपचार तज्ञ श्री.कार्तिकेय महादेविया म्हणणतात तुळशीची पाने दही किंवा गोड ताकाबरोबर खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी होऊन शरीर प्रमाणबद्ध राहते आणि वजन कमी झले तरी थकवा येत नाही. तुळशीत मानसिक ताण कमी करण्याचा हि गुण आहे.
मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अश्या अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे. या गुणांमुळेच आज जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सिरप , गोळ्या आणि तेल बनवण्यात येते. तुळशीचा चहा हि निसर्गौपाचारातील एक खास निर्मिती आहे.
आपल्या अंगणात तुळशीची विपुल झाडे लावली तर त्या झाडांच्या सहवासामुळे प्रतिकार शक्ती वाढून अनेक छोट्या रोगांपासून सुरक्षित राहता येते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दिघ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तुळशीतील या अलौकिक गुणधर्मामुळे आपल्याशी तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक व्रत वैक्ल्यात तुळशीचा समावेश केला आहे.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
 कृष्ण तुळस ज्यांचे दारी आरोग्य नांदे त्यांचे घरी

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात तुळशीला मांगल्याचे प्रतिक मानले जाते. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुळशीच्या विविध जाती आढळतात.

प्राचीन आयुर्वेद ग्रंथांमध्ये तुळशीच्या चार प्रमुख जातींचा उल्लेख केलेला आढळतो:

१) कृष्ण तुळस, 
२) राम तुळस, 
३) रान तुळस, 
४) कापूर तुळस 

या लेखामधून आपण या सर्व जातींमधील सर्वात प्रभावी अशा कृष्ण तुळशीबद्दल माहिती मिळवणार आहोत:

कृष्ण तुळशीचे शास्त्रीय नाव Ocimum Tenuiflorum (उच्चार: ऑसिमम्‌ टॅन्युईफ्लोरम्‌) असे आहे. कृष्ण तुळशीला भगवान कृष्णांच्या "श्याम" ह्या नावावरून व त्यांच्या सावळ्या रंगाशी असलेल्या साधर्म्यामुळे श्याम तुळस असेही म्हटले जाते. ह्या तुळशीची पानांचा रंग जांभळा असतो व देठही त्याच रंगाचा पण गडद असतो. कृष्ण तुळशीची पाने चावताना कुरकुरीत व चवीला किंचीत तिखट लागतात. भारताच्या बहुतांश भागात ही तुळस उगत असली तरी इतर तुळशींच्या मानाने ही चटकन उपलब्ध होत नाही. 

तुळशीच्या इतर जातींच्या तुलनेत कृष्ण तुळशीचे रोप मंद गतीने मोठे होते. पानांचा कुरकुरीतपणा व तिखट चवीला ही मंद वाढच कारणीभूत आहे, असं मानलं जातं. कृष्ण तुळशीची पाने चवीला इतर तुळशींच्या मानाने कमी तुरट असतात.

जर घरी कृष्ण तुळस लावणार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
१) कृष्ण तुळशीच्या मंजीऱ्यांपासून रोप उगवण्यास एक ते दोन आठवड्यांचा अवधी लागतो म्हणून धीर धरा.
२) शक्यतो वसंत ऋतूमध्ये मंजीऱ्या पेरा.
३) मंजिऱ्या पेरल्यावर नियमीत पाणी द्या.
४) कसदार माती वापरा.
५) कृष्ण तुळशीला सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
६) कृष्ण तुळशीला समशीतोष्ण हवामान चांगले मानवते.

औषधी वनस्पती म्हणून तुळस फार मौल्यवान आहे. अनेक लोक तुळशीचा ताज्या पानांचा रस नियमित पितात. अनेक दुखण्यांवर गुणकारी औषध म्हणून शतकानुशतके तुळशीचा वापर केला गेला आहे.

कृष्ण तुळशीचे काही औषधी फायदे:
१) घशाचे विकार, श्वसनाचे विकार, नाकाच्या आतील जखमेचे व्रण, कानाचे दुखणे व त्वचारोग यावर गुणकारी. तुळशीचा काढा करून प्यावा.
२) कानात औषध म्हणून तुळशीच्या तेलाचे थेंब टाकता येतात.
३) मलेरियासारख्या आजाराला दूर करण्यासाठी तुळशीचा उपयोग होतो.
४) अपचन, डोकेदुखी, निद्रानाश, फेफरे येणे व पटकी सारख्या आजारांवरदेखील तुळशीचा काढा हे गुणकारी औषध आहे.

अनेक लोक, विशेषत: वारकरी संप्रदायाचे लोक गळ्यामध्ये तुळशीच्या मण्यांची माळ घालतात. नकारात्मक शक्तींपासून बचाव करण्यासाठी तुळशीच्या माळा उपयुक्त असतात, असे मानले जाते. हल्ली तर तुळशीच्या मण्यांपासून बनलेल्या आधुनिक माळाही गळ्यात घालण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. 
 Kalpana Rane
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

 राम तुळस : हिरव्या पानांची ही तुळस सर्वाच्या परिचयाची आहे.

कृष्ण तुळस : या तुळशीची पाने कडक सूर्यप्रकाशात जांभळट-काळपट रंगाची होतात, पण सावलीत याची पाने थोडी हिरवट छटा असलेली राहतात.

कापूर तुळस : तुळशीच्या सर्वसामान्य पानांसारखेच पण थोडे टोकदार पान असलेली ही तुळस आहे. नावाप्रमाणे याच्या पानांना कापरासारखा सुवास असतो.

बॅसिल तुळस : पानांचा आकार सर्वसामान्य तुळशीसारखाच असतो. याच्या फुलांचे तुरे थोडे जास्त जांभळट दिसतात.

लेमन तुळस : या तुळशीच्या पानांना लिंबासारखा सुवास येतो म्हणून याला लेमन तुळस म्हणतात.

वैजयंती तुळस : याचे पान सर्वसामान्य तुळशीच्या पानापेक्षा थोडे मोठे रुंद व जास्त टोकदार असते.

कुंडीमध्ये तुळशीचे रोप लावताना माती व खताचे योग्य प्रमाण, नंतरची निगा, आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश व पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन या सर्व बाबींचा नीट अवलंब करून तुळशीचे रोप छान वाढवता येते.

,🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

 आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे तुळस वनस्पतीचे औषधी वनस्पतींमध्ये अग्रगण्य स्थान आहे. तुळस वनस्पतीचे फक्त पानेच गुणकारी नसून या वनस्पतीची फुलेही तितकीच बहुगुणी आहेत. पुढील दहा आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी तुळस वनस्पती हे उत्तम औषध ठरते..

१. ताप- तुळशीच्या पानांचा रस तापाचे प्रमाण कमी करण्यास मदतगार ठरतो.

२. सर्दी- रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळल्याने सर्दी दूर होऊ शकते.

३. घसा खवखवणे- गरम पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळणी करावी. दमा आणि ब्राँकायटिस असणाऱयांनाही हे लाभदायक ठरते.

४. डोकेदुखी- अतिउष्णतेने डोकेदुखीची समस्या निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे. अशावेळी तुळशीची पाने आणि चंदनाची पेस्ट करून कपाळावर लावावी. यामुळे नक्कीच डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

५. डोळ्यांची समस्या- डोळ्यांच्या समस्यांवर तुळशीच्या काळ्या पानांचा रस महत्त्वाची भूमिका निभावतो. तुळशीच्या काळ्या पानांच्या (कृष्ण तुळस) रसाचे काही थेंब डोळ्यात टाकल्याने दाहकात कमी होण्यास मदत होते.

६. दातांची समस्या- तुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.

७. त्वचेच्या समस्या- त्वचेच्या समस्यांवरही तुळशीच्या पानांचा रस गुणाकारी आहे. 

८. कीटक चावणे- डास आणि इतर कीटकांचे चावणे मुख्यत: मान्सूनच्या महिन्यात अशा समस्या वाढतात. अशावेळी ज्या ठिकाणी किटक चावला आहे तेथे तुळशीच्या मुळांची पेस्ट लावावी.  

९. किडनी स्टोन- किडनी स्टोनच्या समस्येला सामोरे जाणाऱयांनी मध आणि तुळशीच्या पानांच्या रस मिश्रित मिश्रण प्यावे. 

१०. मानसिक तणाव- रोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"