सर्व सामान्य मनुष्याचा स्वभाव फार विचित्र, कृतघ्न,बेजबाब-दारपणे वागण्याचा असतो.जन्माला घालतानाच शरीरांर्गत किती आश्चर्यकारक सुविधा परमेश्वराने निर्माण करून दिल्या आहेत.आपण स्वस्थ बसलो असलो तरी शरीरांर्गत इंद्रिये आपापले काम चोख करीत असतात.हृदय अहोरात्र स्पंदन करीत असते.आंतडी अखंड चयापचय करीत असतात.फुफ्फु-
से ऑक्सीजनचा पुरवठा करीत असतात.मेंदू सतत सावध राहून इंद्रियांना सूचना देऊन आपले संरक्षण करीत असतो. रक्तातल्या पांढ-या पेशी सीमेवर गस्त घालून शत्रू आत घुसला रे घुसला की त्याला कंठस्नान घालून संपवीत असतात.त्यासा-ठी त्यांचे केवढे मोठे 'प्लेटलेटस्'चे सैन्य सज्ज असते.लाळो-त्पादक ग्रंथीही लाळेतून निर्जंतुकीकरण करीतअसतात.शरीरां-तील कितीतरी रसायने इंद्रियांना परस्पर सहाय्य करीत असतात.आपल्याला स्वस्थ ठेवण्यासाठी शरीरात किती यंत्रणा
सतत कामे करीत असतात. अगदी वीर्यातल्या 'स्पर्म'ला स्त्रीबीजामध्ये सुखरूप नेऊन गर्भधारणा करण्यापासून योनी-
मार्गे जन्माला घालण्यापर्यंतची प्रोसेस कोण करीत असेल ह्याचा विचार केला की मस्तक ईश्वरी चरणकमलावर घट्ट विसावते.दिसीमासी वाढणा-या शरीराची रचना पाहूनही थक्क व्हायला होते."पापा दाहोनी पुण्य राहे!तैच पावे हा नरदेहे!"
"दुर्लभ नरदेह पावलासी खरा! याचा लोभ मोहे न करी मातेरा"
पण आयते सर्व मीळाले की किंमत रहात नाही.पाणी भरपूर
मिळाले की अपव्यय सुरू होतो.या गुंतागुंतीच्या शरीरयंत्राला
परमेश्वराने इतक्या विश्वासाने आपल्याला सुपूर्द केले आहे तर त्याची जिवापाड काळजी आपणच घ्यायला नको का? पण
अतिरेकी व्यसनाने,विलासाच्या उपभोगाने,निसर्गनियम डावलू
न,निष्काळजीपणाने,क्षणिक लोभाने आपण ह्या परमेश्वरी देण
गीचा मातेरा करून टाकतो.अशा बेबंद व्यसनाने अकाली मृत्यु
आलेल्या कलावंताचा,राजकारण्याचा,किंवा कुठल्याही क्षेत्रांतील प्रसिध्द व्यक्तीचे मरणोत्तर फार कौतुक केले जाते पण हा मृत्यू अकाली आल्याची कारणे सांगून अंत्ययात्रेला आलेल्या ढोंगी लोकांपैकी एकहीजण खरे कारण सांगून सावध करीत नाही.म्हणून 'यकृत विकाराने मृत्यू' अशी बातमी वाचली की सूज्ञ सारे ओळखतात.खरोखरच या दैवी ईश्वरी शरीर यंत्राची थोरवी ओळखून त्याची डोळ्तात तेल घालून काळजी घेणा-यांना माझे कोटी सलाम.एवढी मोठी देणगी मिळाली आहे तर रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे.नियमितव्यायाम,योगसाधना,आहारविहार,उपासना,मनाची शांती,निर्व्यसनीपणा अशा दिव्य शस्त्रांनी आपण निश्चये ही संरक्षणाची जबाबदारी पार पाडू शकतो."निश्चयाचे बळ!तुका म्हणे तैचि फळ!. *जय श्री धन्वंतरी देव्यै नम:
* श र द उ पा ध्ये.*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"