Thursday, February 7, 2019

दैव बलवत्तर तर सर्व काही ठीक असते.

शिक्षण एक नोकरी दुसरी..
शिक्षण हा मानवी विकासाचा महत्त्वाचं
टप्पा आहे.
प्रमुख घटक आहे.आणि ही प्रक्रिया
सतत चालू राहणारी असते.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस काही ना काही शिकतच
असतो.
लौकिक दृष्ट्या शाळा कॉलेज मध्ये
घेतले जाणारे शिक्षण याचा नोकरी
व्यवसायाशी थेट संबध असल्याने
आणि ते अर्थार्जन धन पैसा मिळवण्यासाठी महत्त्वाचं असतो.
        
चतुर्थ भाव हा व्यक्ती चे प्राथमिक शिक्षण..technical .diploma 
दाखवतो.
पंचम भाव व्यक्तीचे माध्यमिक शिक्षण
पदवीपर्यंत चे शिक्षण दाखवतो.
लाभ स्थान पदवी नंतरचे शिक्षण ,उच्च
शिक्षण त्यातून होणारा लाभ दाखवतो.
अष्टम स्थान उच्च शिक्षणात येणारे अडथळे  आणि शिक्षणाचा शेवट
दाखवतो.
अष्टम स्थान शिक्षणाचा शेवट दाखवते.
एखाद्या अभ्यास क्रमाचा शेवट झाल्याशिवाय पुढील शिक्षण व नोकरी
कडे वळता येत नाही.
दशम स्थान तुम्ही घेतलेल्या शिक्षण
याचे शेवटी मिळणारे फळ परिणीती
म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय या द्वारे
पैसा कसा मिळवावा हे दाखवते.

काही वेळा घेतलेल्या शिक्षणाचा 
योग्य उपयोग होत नाही..
म्हणजे एखादा डॉक्टर दवाखाना
चालत नाही म्हणून वडा पाव ची गाडी लावतो.
तर एखादा graduate नसलेला मनुष्य उत्तम क्रिकेटर म्हणून नाव यश कीर्ती पैसा मिळवतो .
तर एखादा चहा वाला अख्ख्या जगाला नाचवतो..

का असे होते ..काय कारण असेल याला..??
१ ५ ९ ही कर्म स्थाने तर महत्त्वाची
असतातच...याशिवाय..
पंचमेष  शिक्षणाचा कारक हा जर चर
१ ४ ७ ८ १२ . राशीनुसार चर राशी चा
असेल तर योग्य निर्णय घेवू देणार नाही
पचमेश जर स्थिर राशीत असेल
तर शिक्षण व्यवस्थित पूर्ण करेल.
आणि जर द्वी स्वभाव राशीत असेल
तर धरसोड वृत्ती एक ना धड भाराभर
चिंध्या करेल

याच प्रमाणे दशमेश असता नोकरीत पण वरील प्रमाणेच बदल होतील.
जवळ जवळ १०० पत्रिकांचा 
अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की ५० टक्के पत्रिकेत प्राथमिक
शिक्षणात अडचणी येतात.
तर 40टक्के पत्रिका मध्ये माध्यमिक 
पदवीपर्यंतचे शिक्षणात अडचणी येतात.
अशा खूपच कमी पत्रिका असतात की
ज्याचे पूर्ण प्राथमिक आणि पदवी पर्यंत चे शिक्षण व्यवस्थित झाले आहे.

अशाच प्रकारे दहावे स्थान किंवा
दशमेश स्थिर राशीत असताना स्थिर नोकरी वा व्यवसाय दिसून येतो तर
चर राशीत असताना नोकरी व व्यवसाय बदल दिसतो 
तर द्विस्वभाव असेल तर एक ना धड भाराभर चिंध्या..असे दिसते.

याशिवाय रवी मंगळ शुक्र चंद्र आणि 
गुरु सारखे शुभ ग्रह त्यांची दृष्टी
शुभ फळं देतात.तर शनी मंगळ राहू
केतू सारखे अशुभ ग्रह त्यांची अशुभ दृष्टी ही अशुभ ता वाढवते.
याखेरीज चालू असणाऱ्या दशा अंतर दशा ही महत्वाचे ठरतात..

आणि वरील सर्व  गोष्टी खेरीज भाग्य
प्रारब्ध संचित याचा पण वाटा असतो.आणि शेवटी दैव बलवत्तर तर सर्व काही ठीक असते.
कार्याला प्रयत्नाची जोड मिळाली की दुधात साखर.. असो..

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"