*🌹श्री🌹स्वामी🌹समर्थ*
*आजची स्वामी कथा मस्त आहे*🙏🏻👇🏻
*काय म्हणतोस.. तुला मुलगा पाहिजे आहे.. जा एक वर्षाच्या आत तुला मुलगा होईल..!*
*|| स्वामी लीला ||*
*स्वामी भक्त हो !!*
*आपले स्वामी महाराज सर्व विश्वाची आई आहे..* *ती सर्वांचे लाड पुरवते आहे.. ती सर्वांचे पालन पोषण करते आहे..* *सर्वांच्या गरजांची पूर्तता स्वामी माउली करते आहे.. मग तो आपल्या नजरेत कोणत्याही जातीचा..धर्माचा पंथाचा वा देशाचा असो.*
*असेच एकदा सोलापूर शहरात एक युरोपियन व्यक्ती रहात होती.. तो रेल्वे मध्ये कामाला होता.. त्यास संतती नसल्याच्या कारणाने अतिशय दु:खी होता..* *एके दिवशी त्यास असे समजते कि जवळच असलेल्या अक्कलकोट मध्ये कोणीतरी श्री स्वामी समर्थ म्हणून अवतारी विभूती आलेली आहे.. त्यांच्या कडे गेल्यास नक्कीच आपले दु:ख दूर होते... त्यानंतर अनेक भाविकांकडून स्वामींच्या लीलांचे.. स्वामींच्या चमत्कारांचे त्याने श्रवण केल्या नंतर त्यास खूप विश्वास येतो..* *आणि लगबगीने तो स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट नगरीत येतो.. अक्कलकोट नगरीत आल्या नंतर ज्या ठिकाणी स्वामींची स्वारी होती तेथे तो येतो.. स्वामींचे आजानुबाहू..* *तेजस्वी रूप पाहून त्याचे डोळे दिपतात आणि स्वामींच्या समोर हात जोडून उभा राहतो.. हात जोडल्या नंतर तो मनातल्या मनात आपल्या समस्येचे चिंतन करत असतो.. असे चिंतन सुरु असतांना स्वामींनी एकदम त्याच्या कडे बघितले आणि बोलले.."काय म्हणतोस.. तुला मुलगा पाहिजे आहे.. जा एक वर्षाच्या आत तुला मुलगा होईल..!! "* *स्वामींनी असे बोलताच त्या युरोपीयन व्यक्तीला खूप आश्चर्य वाटले.. मी तर प्रथमच स्वामींकडे आलो आहे.. आणि माझी समस्या स्वामींना कशी समजली..* *स्वामींच्या अंत: साक्षित्वाचे बोलणे ऐकताच युरोपीयन अधिकाऱ्यास स्वामींच्या सामर्थ्याची जाणीव होते... आणि स्वामींच्या चरणी लोटांगण घालतो.. आणि अतिशय आनंदाने घरी जातो..*
*स्वामी भक्त हो !! "तुला मुलगा होईल " हि स्वामी वाणी होती.. ती सत्यच असणार आणि त्याच प्रमाणे त्या युरोपीयन व्यक्तीस प्रत्यय येतो..* *बरोबर एक वर्षाच्या आता त्यास गोंडस मुलगा होतो.. दोघेही अतिशय आंनदी होतात.. आणि स्वामींच्या दर्शनासाठी येतात.. स्वामींच्या लीलांचे गुणगान गातात..*
*त्या नंतर त्याच्या परिचयातील असंख्य युरोपीयन व्यक्ती स्वामींच्या सेवेत येतात..त्यांस सुद्धा अनुभव आलेत.. ते सुद्धा अधून मधून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये येत..*
*बोला अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!*
*🌹स्वामीगुरूमाऊली🌹*🙏🏻🙏🏻
*आजची स्वामी कथा*🙏🏻☝🏻
*बोध सांगावे*🙏🏻☝🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"