*श्रीराम* 🙏🏻
भगवंताकडे बाह्य इंद्रियांच्या भक्तिकर्माची नोंद होत नाही. तसे असते तर बहिऱ्या माणसांनी म्हटले असते, आम्हाला कानाने हरिकथा, संकीर्तन ऐकता येत नाही, आम्हाला भक्तिमार्गात थोडी सूट द्यावी, मुक्यांनी म्हटले असते, आम्हाला तोंडाने हरिनाम घेता येत नाही, आम्हाला सूट द्यावी, आंधळे म्हटले असते, आम्हाला डोळ्यांनी रूप दिसत नाही, आम्हाला सूट द्यावी! पण भगवंतांनी यातल्या कुणालाच सूटही दिली नाही किंवा दूरही केले नाही. त्यांनी एकच सांगितले, मन्मना भव!
मन हे असं इंद्रिय आहे, जो या जगात जन्म घेणारा कोणताही मनुष्यप्राणी माझ्याजवळ नाही म्हणू शकत नाही. तुमच्याजवळ कोणतंही बाह्य इंद्रिय असो वा नसो, जोवर तुम्ही मन अर्पण करत नाही, तोवर केवळ बाह्य इंद्रियांनी केलेल्या भक्तीच्या कोणत्याही कृतीला फारसं महत्त्व राहात नाही आणि त्या भक्तिकर्माची भगवंताच्या दरबारात नोंदही होत नाही! हे ध्यानात घेऊन जो साधना करेल तो खरा साधक!
🌹🍃🌹 *||श्रीमद्भागवत||* 🌹🍃🌹
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"